पुन्हा कार्याचा गौरव | स्वयंसहायतामध्ये विविध उपक्रम राबविण्यात ‘झेडपी’ तिसऱ्या क्रमांकावर..

0

स्वयंसहायतामध्ये विविध उपक्रम राबविण्यात सोलापूर झेडपी तिसऱ्या क्रमांकावर

सोलापूर – स्वयंसहायता गटामध्ये वेगवेगळे उपक्रम राबविण्यात सोलापूर जिल्हा परिषदेने राज्यात तिसरा क्रमांक क्रमांक पटकावला आहे.
राज्यात यवतमाळ जिल्हा प्रथम, वर्धा जिल्हा दुसरा तर सोलापूर जिल्ह्याने तिसरा क्रमांक पटकावल्याने राज्यामध्ये सोलापूर झेडपी चे नाव लौकिक झाले असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.

उमेद अभियान च्या माध्यमातून कृतीसंगम व water. org च्या संयुक्त माध्यमातून महिला स्वंयसहाय्यता समूहांना प्राप्त बँक कर्ज माध्यमातून शौचालय दुरुस्ती, नवीन शौचालय उभारणी, न्हाणी घर दुरुस्ती पिण्याचे पाणीसाठी नळ जोडणी, पेय जल शुद्धीकरण यंत्र बसवणे असे उपक्रम जिल्ह्यात विविध तालुक्यात घेण्यात आले. या विविध उपक्रमाचे राज्यामध्ये कौतुक करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे अन्न, पोषण, आरोग्य व पाणी FNHW( food Nutrition Health water ) बाबत कृतिसंगम मधून समुदाय संसाधन व्यक्ती यांच्या माध्यमातून ग्रामसंघ व प्रभाग संघ यांच्या माध्यमातून गाव पातळीवर जनजागृती करून उपक्रम राबविले जातात.
यामध्ये सोलापूर जिल्ह्याने 9 हजार 763 स्वयंसहायता गटामध्ये वेगवेगळे उपक्रम राबविले. या उपक्रमात अनेक जिल्ह्यांनी भाग घेतला होता परंतु त्यामध्ये राज्यात यवतमाळ जिल्हा प्रथम, वर्धा जिल्हा दुसरा तर सोलापूर जिल्ह्याने तिसरा क्रमांक पटकावला आहे.
या साठी प्रकल्प संचालक उमेशचंद्र कुलकर्णी, अभियान व्यवस्थापक सचिन चवरे यांचे सह सर्व उमेद टीमने यांनी प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here