सोलापूर| ‘त्या’ पीडित कुटुंबाला दिली 51 हजारांची मदत ; युवा सेनेने जपलं सामाजिक भान

0
  • पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त  
  • सोलापूर शहर युवा सेनेने जपली सामाजिक बांधिलकी 
  • लवंगीच्या पिडीत कुटुंबियांना ५१ हजाराची रोख मदत 

    सोलापूर- ( प्रतिनिधी ) – राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस महाराष्ट्रात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. मात्र सोलापूर शहर युवा सेनेच्यावतीने सामाजिक बांधिलकी जपत वाढदिनाचे औचित्य साधून दक्षिण सोलापूर तालुक्यातील पिडीत तानवडे व पारशेट्टी परिवाराला प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन ५१ हजार रुपयांची रोख मदत देण्यात आली. युवा सेनेचे शहर प्रमुख विठ्ठल वानकर यांच्या नेतृत्वाखालील युवा सेनेच्या शिष्टमंडळाने कुटुंबातील प्रमुखांच्या हातात ५१ हजाराची रक्कम सुपूर्द करून सांत्वन केले.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या वाढदिनी अनावश्यक खर्चाला फाटा देऊन सामाजिक उपक्रम राबविण्याबाबत आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत शहर युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विचारविनिमय करून दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी येथील पारशेट्टी व तानवडे परिवारातील चार शाळकरी मुले नुकतीच नदीत पोहताना बुडून मृत्युमुखी पडली होती. त्यांच्या कुटुंबातील प्रमुखांना भेटून रोख स्वरूपात मदत देण्याचा विचार समोर आल्यानंतर त्यावर एकमत होऊन रविवारी दुपारी त्यांच्या गावी जाऊन मदत सुपूर्द केली.


यावेळी युवा सेनेचे जिल्हा समन्वयक सुमित साळुंखे,जिल्हा सचिव योगेश भोसले,उपजिल्हा युवा अधिकारी बालाजी चौगुले, शहर समन्वयक गुरुनाथ शिंदे,कॉलेज कक्ष अधिकारी शुभम घोलप आणि अतुल नवले उपस्थित होते.


मदत नव्हे कर्तव्य 
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे सामाजिक काम सर्वश्रुत आहेच. त्यांच्याच कामाचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन व त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहर युवा सेनेच्यावतीने पिडीत कुटुंबातील प्रमुखांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. मात्र हि मदत नव्हे तर ते आमचे आम्ही कर्तव्य समजतो. पिडीत कुटुंबाला आता देण्यात आलेली मदत हि प्रातिनिधिक स्वरूपातील असली तरी त्यांना भरघोस मदत करण्यासाठी युवा सेनेच्यावतीने शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे युवा सेनेचे शहर प्रमुख विठ्ठल वानकर यांनी सांगितले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here