योग ही भारताने संपूर्ण जगाला दिलेली अमूल्य देणगी – राष्ट्रपती रामनाथ कोविंद

मुंबईतील ‘द योगा इन्स्टिट्यूट’ च्या शताब्दी महोत्सवाचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन

0

By-एम एच१३ न्यूज वेब/टीम

योग ही भारताने संपूर्ण जगाला दिलेली अमूल्य देणगी असून योगामुळे मनुष्य, समाज, देश आणि विश्व जोडण्याचे काम होत असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी काढले.

योग प्रशिक्षण संस्थेचा शताब्दी महोत्सव वांद्रे कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती राम नाथ कोविंद उपस्थित होते. त्यावेळी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी येणाऱ्या काळातही या संस्थेने मानवी जीवनाच्या विकासात योगदान देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान द्यावे, अशी भावना व्यक्त केली. या कार्यक्रमास राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्यासह  राष्ट्रपतींच्या पत्नी श्रीमती सविता कोविंद, राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री (आयुष) श्रीपाद नाईक, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, योगा इन्स्टिट्यूटच्या संचालक डॉ. हंसाजी जयदेव, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

 

राष्ट्रपती म्हणाले, मुंबई देशाची आर्थिक,सांस्कृतिक राजधानी आहे. आज येथे मनुष्य जीवनाच्या संबंधित सर्व कला,संस्कृती, विज्ञान,अध्यात्म आदींच्या अभ्यासासोबत योग विद्येचा अभ्यासदेखील प्रामुख्याने होतो. योग विद्येच्या प्रचार आणि प्रसारासाठी अनेक महान व्यक्तींनी आपले मोलाचे योगदान दिले आहे. आज या संस्थेला 100 वर्ष पूर्ण झाली असली तरी येणाऱ्या काळात या संस्थेला समाजाच्या संतुलित विकासासाठी, आरोग्यासाठी योगदान द्यायचे आहे. मला आनंद वाटतो की ट्रक चालकांसाठी ट्रक आसन निर्माण केले. योग हे शरीर मन आणि आत्मा यांना जोडण्याचे काम करत असून आज योग हा आंतरराष्ट्रीय पातळीवरही स्वीकारला गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here