सोलापूर – लोकमंगल समूहाच्या वतीने जागतिक योग दिनाचे औचित्य साधून मंगळवार 21 जून रोजी शासकीय मैदान, विजापूर रोड येथे लोकमंगल समूह व पतंजली योग समितीच्या संयुक्त विद्यमाने योग शिबीर घेण्यात आले.
लोकमंगल समूहाचे संस्थापक अध्यक्ष आ. सुभाष देशमुख या योग शिबिरास उपस्थित होते.
सध्या लोकमंगल समूहाचे रौप्यमहोत्सवी वर्ष सुरू आहे. या निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे त्याचाच एक भाग म्हणून योग दिनानिमित्त शहरात 49 ठिकाणी शिबिर घेण्यात आले.
आमदार सुभाष देशमुख म्हणाले की, आजच्या जीवनात योगाला फार महत्त्व आले आह. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही वेळात वेळ काढून दररोज योगा करत असता. नागरिकांनी दररोज योगा करावा आणि आपले शरीर स्वस्थ ठेवावे. या शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने या शिबिरात सहभाग नोंदवला.