सायकल बँक | CEO स्वामींच्या उपक्रमाचे महिला आयोगाने केलं कौतुक

0

MH 13 News Network

सोलापूर झेडपी सीईओ स्वामींच्या ‘सायकल बॅंक’ उपक्रमाचे महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केले कौतुक…

महिला आयोग आपल्या दारी हा उपक्रम मंगळवारी सोलापुरात होता. स्वतः आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सुनावणी घेतली. त्यांनतर पत्रकार परिषदेत माहिती देताना त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्ह्यात राबविलेल्या जिल्हा परिषद शाळांच्या मुलींसाठी सायकल बँक या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले, या उपक्रमामुळे हजारो मुलींचे शिक्षण पूर्ण करता येणार आहे. हजारो मुली केवळ सायकल घेण्याची परिस्थिती नाही म्हणून शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडत होत्या ते या *सायकल बॅंक* उपक्रमामुळे थांबले आहे. पुढे जाऊन राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या सीईओ यांनी हा उपक्रम राबवावा यासाठी शासनाला शिफारस करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसहभागातून सोलापूर जिल्ह्यात सायकल बॅंक हा उपक्रम सीईओ स्वामी यांनी राबविला. माळशिरस तालुक्यातील निमगाव मधून सुरू झालेला हा उपक्रम पुढे जाऊन उपक्रम न राहता एक चळवळ बनला. कित्येक संस्था, दानशूर व्यक्ती, जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी या उपक्रमात सहभाग घेऊन मुलींसाठी सायकली भेट दिल्या आहेत. जमा झालेल्या या सायकली शाळांना सुपूर्द करण्यात आल्या आहेत. शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर मुलींना दिलेल्या सायकली शाळेत जमा करण्यात येतील व पुढील शैक्षणिक वर्षात पुन्हा मुलींना देण्यात येतील असे या अभियानाचे स्वरूप आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here