आसरा रेल्वे पुलाचे रुंदीकरण करा अन्यथा रस्ता रोको आंदोलन : संभाजी ब्रिगेड

0

सोलापूर (प्रतिनिधी)

विजापूर रोड वरील रेल्वे पूल बंद झाल्यामुळे या मार्गावरून होणारी जड वाहतूक डी मार्ट चौक आसरा चौक होटगी रोड या मार्गावर वळविण्यात आल्यामुळे तसचं डि मार्ट चौक आसरा चौक होटगी रोड वरील वाहतूक जाम होत असून दुचाकीस्वारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे आधीच अरुंद असलेल्या आसरा रेल्वे ब्रिज पुलावरील रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले आहेत त्यामुळे खड्डे चुकवताना जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे आसरा पुलावरील खड्डे त्वरित बुजविण्या एवजी संपूर्ण रस्ता साईड पट्टी मारून दुरुस्त करण्यात यावा अन्यथा आसरा पुलावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेड च्या वतीने शहराध्यक्ष श्याम कदम यांनी दिला आहे.

या मार्गावर अनेक मोठमोठे खड्डे असल्यामुळे पूर्वी अनेक छोटे मोठे अपघात घडले आहेत खड्डा चुकविताना एसआरपी जवानासह दोन तीन नागरिकांचा बळी गेला आहे सध्या विजापुर रोड बंद केल्याने जड वाहतुक होटगी रोडने वळवली पण मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होतेय.त्यामुळे नागरीक व इतर वाहनचालक जीव मुठीत धरुन जात आहेत अपघात होण्याची शक्यता आहे.
बंदी काळात जड वाहतुक बंदीची कडक अंमलबजावणी करावी. महावीर चौक आसरा चौक डी मार्ट आयटीआय चौक टाकळीकर मंगल कार्यालय रोडवर २४ तास वाहतुक कर्मचारी नियुक्ती करावी. आठ दिवसांपूर्वी सोलापूर महापालिका आयुक्त यांना मार्गावरील खड्डे बुजवण्याचे निवेदन दिले होते. प्रशासनाने फक्त रस्त्यात प्रीमिक्स टाकून ठिगळ लावण्याचे काम केले आहे. हा रस्ता म्हणजे रस्त्यात खड्डे आहे की खड्डय़ात रस्ता आहे हेच नागरिकांना कळत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

छत्रपती संभाजी महाराज तलाव (कंबर तलाव) सुशोभीकरणाच्या कामासाठी विजापूर रोड वरील चार चाकी आणि जड वाहतूक, सैफुल, मार्गे डी-मार्ट मार्गे आसरा चौक व पुढे अशी वळवली आहे, पण तो बदल करण्याच्या आधी प्रशासनाने आसरा ब्रीज सुस्थितीत आहे का ? ते तपासलं आहे का? नाहीतर कंबर तलावा वरील ब्रीज वाचवायच्या नादात आसरा ब्रीज ढासळण्याची दाट शक्यता निर्माण होईल, कारण तो ब्रीज इतक्या प्रमाणात होणाऱ्या अती जड वाहतुकीसाठी सुरक्षित आहे का? हे बांधकाम विभागाकडून अगर रेल्वे विभागाकडून प्रमाणित करण्यात यावे आणि मगच जड वाहतुकीला परवानगी द्यावी.
यापूर्वी संभाजी ब्रिगेड सोलापूर च्या वतीने हद्दवाढ भागात अनेक नवीन वसाहतीं निर्माण झाले आहे. त्यामुळे लोकसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. आसरा रेल्वे पूल खूप अरुंद असल्याने सतत वाहतुकीची कोंडी होत असते. सुमारे वीस वर्षांपूर्वी बांधलेला जुळे सोलापूर भागाला जोडणारा आसरा रेल्वे पूल अत्यंत अरुंद असल्याने या मार्गाची रुंदीकरण करण्यात यावे, यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता पण अकार्यक्षम महानगर पालिका प्रशासनाने त्याकडे  दुर्लक्ष केले होते. त्यामुळे संभाजी ब्रिगेड च्या वतीने आसरा पुलावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा ईशारा संभाजी ब्रिगेड च्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी भारतीय जैन संघटनेचे श्याम पाटील ,संभाजी ब्रिगेड उपशहर प्रमुख सिताराम बाबर, कृष्णा झिपरे, हर्षवर्धन शेषेराव, बसवराज आळगे  उपस्थित होते.

छत्रपती संभाजी महाराज तलाव (कंबर तलाव) सुशोभीकरणाच्या कामासाठी विजापूर रोड वरील चार चाकी आणि जड वाहतूक, सैफुल, मार्गे डी-मार्ट मार्गे आसरा चौक व पुढे अशी वळवली आहे, पण तो बदल करण्याच्या आधी प्रशासनाने आसरा ब्रीज सुस्थितीत आहे का ? ते तपासलं आहे का? नाहीतर कंबर तलावा वरील ब्रीज वाचवायच्या नादात आसरा ब्रीज ढासळण्याची दाट शक्यता निर्माण होईल, कारण तो ब्रीज इतक्या प्रमाणात होणाऱ्या अती जड वाहतुकीसाठी सुरक्षित आहे का? हे बांधकाम विभागाकडून अगर रेल्वे विभागाकडून प्रमाणित करण्यात यावे आणि मगच जड वाहतुकीला परवानगी द्यावी.

श्याम कदम,अध्यक्ष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here