चक्क .. लग्नात पोस्टर प्रदर्शन, रक्तदान, मुली वाचवा,स्त्रीभ्रूण हत्या ; तहसीलदाराचा अनोखा आदर्श

0

दक्षिण सोलापूरच्या अपर तहसीलदाराचा अनोखा आदर्श : मुला – मुलीच्या लग्नात पोस्टर प्रदर्शनाच्या माध्यमातून रक्तदान, मुली वाचवा,स्त्रीभ्रूण हत्या

बेटी पढावो आणि सर्व धर्म समभाव आणि समाजप्रबोधनाचा संदेश 
वऱ्हाडी मंडळीकडून कौतुकाचा वर्षाव
————————————-
सोलापूर – ( प्रतिनिधी ) – विवाह म्हंटले की अमाप खर्च, पैशांची उधळपट्टी आणि डामडौल आलाच.मात्र हा खर्च करतानाच त्याच मंडपात सामाजिक प्रबोधनाचा एखादा उपक्रम राबविला तर त्याचे कौतुक करावे तितके थोडेच. असाच एक आगळावेगळा उपक्रम राबविला आहे, दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप गावचे अपर तहसिलदार राजशेखर लिंबारे यांनी अपर तहसिलदार राजशेखर लिंबारे यांचे चिरंजीव स्वामीराज आणि कन्या निलम यांचा विवाह सोहळा शनिवार १४ मे २०२२ रोजी दुपारच्या शुभ मुहूर्तावर कुमठे येथील कर्मयोगी आप्पासाहेब काडादी सांस्कृतिक भवनात पार पडला.

या विवाह सोहळ्यात आलेल्या प्रत्येक वऱ्हाडी मंडळींची मने जिंकली ती सांस्कृतिक भवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ भरविण्यात आलेल्या अनोख्या पोस्टर प्रदर्शनाने. सोलापूरचे आंतरराष्ट्रीय चित्रकार व सोलापूर महानगरपालिकेचे ब्रँड अँबेसिडर सचिन खरात यांच्या सामाजिक विषयावरील प्रबोधनात्मक चित्र प्रदर्शनात
रक्तदान जीवनदान, लोकसंख्या नियंत्रण काळाची गरज, सेव्ह एनव्हारमेन्ट, स्त्रीभ्रूण हत्या थांबवा, सेव्ह पेपर, भ्रस्टाचार थांबवा, पाणी हेच जीवन, बेटी बचाओ, बेटी पढाओ, व्यसनमुक्ती, बुद्ध हवा युद्ध नको, ग्लोबल वार्मिंग, माझी वसुंधरा, नो वॉर, येणारं पाऊल स्वच्छतेसाठी, सर्वधर्म समभाव, सौर ऊर्जेचा वापर करा.

युक्रेन-रशिया युद्ध थांबवा, अफगाणिस्तान-तालिबान विषय, झाडे लावा – झाडे जगवा आदी सामाजिक प्रबोधन करणाऱ्या विषयांवर लावण्यात आलेल्या २० हुन अधिक प्रिंट स्वरूपातील चित्रांनी वऱ्हाडी मंडळींवर मोहिनी घातली.याशिवाय कासव तसेच बैलगाडी या माध्यमातून शेतीचा संदेशही देण्यात आला.सांस्कृतिक भवनात प्रवेश करतानाच सर्वप्रथम हे प्रदर्शन पाहूनच वऱ्हाडी मंडळी अक्षतेसाठी कार्यालयात पोहोचली. दिवसभर हजारो वऱ्हाडी मंडळींनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला तर पोस्टर आणि बैलगाडीसोबत सेल्फी घेण्यासाठी वऱ्हाडीची रीघ लागली होती.चित्रकार सचिन खरात यांनीसुद्धा या चित्रांचे महत्व सर्वांना पटवून सांगितले.

सामाजिक बांधिलकी

आपण शासनाचे अधिकारी म्हणून काम पाहत आहोत.समाजाच्या जाणीवा आणि उणिवा आपण जाणतो.आज एका वेगळ्या समस्येतून आपण जात आहोत.पाणी,वीज,झाडांची मोठी समस्या सर्वत्र जाणवत आहे.मुलींचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. त्यामुळे मुला-मुलीच्या विवाहाचे औचित्य साधून समाजापर्यंत एक सामाजिक संदेश जावा आणि त्यातून जनतेचे प्रबोधन व्हावे या उदात्त हेतून चित्रकार सचिन खरात यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले असल्याचे अपर तहसीलदार राजशेखर लिंबारे यांनी सांगितले. विवाहावर खर्च होत असताना सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आपण हा उपक्रम आपल्या मुला-मुलींच्या लग्नात राबविला असून लग्नात खर्च करत असताना त्याचा एक कोपरा सामाजिक बांधिलकी म्हणून राखून ठेवावा असे आवाहन राजशेखर लिंबारे यांनी केले.

सचिन खरात यांच्याकडून पाचशे रोपांचे वाटप..

सोलापूर महानगरपालिकेचे ब्रँड ॲम्बेसिडर सचिन खरात यांनी माजी वसुंधरा अंतर्गत या विवाह सोहळ्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना पाचशे रोपांचे वाटप करून वृक्ष संवर्धनाला गती देण्याचे आवाहन केले.अधिकारी या रोपांची जपणूक करून त्याला मोठ्या वृक्षात रूपांतरित करण्यास हातभार लावतील असे सचिन खरात म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here