कमकुवत लोकच जाती-धर्माचा आधार घेतात ; प्रणिती शिंदे

0

by-MH13News,network

निवडणूक ही विकासकामांच्या मुद्यावर लढली जाते, पण काम न करणारी मंडळी कमकुवत असतात. असे लोक जाती-धर्माचा वापर करुन जनतेला भुुलविण्याचा प्रयत्न करतात. जनतेने याला बळी न पडता विकासकाम करणार्‍या व सर्वधर्मसमभावाची जोपासणूक करणार्‍या उमेदवाराला निवडून दिले पाहिजेे, असे आवाहन शहर मध्य मतदारसंघातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार आ. प्रणितीताई शिंदे यांनी सेटलमेंट, मौलाली चौक, कुमठा नाका, बापूजीनगर अशा विविध ठिकाणी झालेल्या कॉर्नर सभेत केले.


मौलाली चौकातील सभेस माजी महापौर यु.एन. बेरिया यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रणितीताई पुढे म्हणाल्या की, स्वत:च्या मतदारसंघातील लढायची ताकद नसलेले लोक दुसर्‍या मतदारसंघात जाऊन एका महिलेविरुद्ध लढताहेत. पण अशांनी हे लक्षात घ्यावे की निवडणूक जिंकण्यासाठी आधी विकास कामे करावी लागतात, मतदारसंघाची बांधणी करावी लागते. पण असे काहीच कर्तृत्व नसलेले लोक आमिष दाखवून निवडणूक लढवितात. पाच वर्षातून केवळ एकदाच दिसतात, नंतर गायब होतात. अशांना या निवडणुकीत जनतेने अजिबात थारा देऊ नये.


यु.एन. बेरिया म्हणाले, प्रणितीताईंनी या मतदारसंघात 10 वर्षे काम केले आहे.अन्य उमेदवारांचे 5 वर्षदेखील काम नाही. यंत्रमाग, विडी कामगारांचे प्रश्‍न विधानसभेत मांडून सामान्यांशी बांधिलकी जोपासण्याचे काम केले. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या मतांचे विभाजन करण्याचा विरोधकांचा घाट यशस्वी झाला. या निवडणुकीतदेखील विरोधक मतविभाजनासाठीच लढत आहेत, पण लोकसभेची पुनरावृत्ती न करता जनतेने त्यांना धडा शिकवावा, असे आवाहन बेरिया यांनी केले.
सेटलमेंट येथील सभेला सूरज गायकवाड, ज्ञानदीप जाधव, विशाल गायकवाड, ज्ञानदीप गायकवाड, संदीप गायकवाड, विकास जाधव, टकलेश जाधव, प्रशांत जाधव, अजित जाधव, चिरंजीव जाधव, अभिजित पाटील, बबलू गायकवाड आदी उपस्थित होेते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here