पोलीस पाटलांच्या विविध मागण्या संदर्भात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यासोबत लवकरच बैठक घेऊ आणि सर्व मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, असे प्रतिपादन आमदार सुभाष देशमुख यांनी केले.
पोलीस पाटलांना किमान कायद्यानुसार वेतन मिळावे यासह विविध मागण्यांसाठी पोलीस पाटील संघटनेच्या वतीने आमदार सुभाष देशमुख यांना निवेदन देण्यात आले, त्यावेळी आ. देशमुख बोलत होते.
पोलीस पाटील यांना किमान वेतन कायद्यानुसार मिळावे, पोलीस पाटील यांचे नूतनीकरण तत्काळ थांबवावे, पोलीस पाटील यांचा प्रवास भत्ता दुप्पट करावा, पोलीस पाटील यांची वयोमर्यादा 60 वर्षांवरून 65 वर्षे करण्यात यावी, पोलीस पाटील सेवानिवृत्ती नंतर एक रकमी रुपये वीस लाख मिळावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी आ. सुभाष देशमुख यांनी परत लवकर सर्व मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.