महायुतीस दिलेल्या पाठिंब्याशी कसलाही संबंध नाही ; मराठा क्रांती मोर्चा

0

By-MH 13 News, नेटवर्क

मराठा क्रांती मोर्चा ही पक्ष विरहित सामाजिक संघटन असून मराठा समाजाच्या हिताचे कार्य करण्याच्या स्वच्छ हेतूने मराठा क्रांती मोर्चाचे आजपर्यंतचे काम चालू होते व आजही आहेत. तसेच मराठा मोर्चावेळी शहर-जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी जाहीर पाठींबा दिला होता. त्यामुळे काल मराठा क्रांती मोर्चाच्या काही समन्वयकानी महायुतीस दिलेला पाठींबा हा पुर्णपणे चुकीचा आहे. काही समन्वयकामुळे समाज एका पक्षाच्या दावणीला बांधणे, हे सर्वस्वी चुकीचे असल्यामुळे आज आम्ही सर्व समन्वयक मराठा क्रांती मोर्चाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी हे पत्रक काढीत आहोत.

मराठा समाज हा सर्व पक्षात विभागलेला असून मराठ्यांचा एका विशिष्ट पक्षाला किंवा नेत्याला पाठींबा देणे म्हणजे समस्त मराठा समाजाची फसवणूक करण्या सारखेच आहे. मराठा आरक्षणासाठी कार्य करणार्याम असंख्य युवक व व्यक्ति ह्या विविध पक्ष व संघटनामध्ये विभागलेले असल्याने मराठा क्रांती मोर्चा कोणत्याही पक्षाला किंवा नेत्याला पाठींबा देणार नाही, अशी अराजकीय भूमिका आजपर्यंत क्रांती मोर्चाची होती व इथून पुढेही हिच भूमिका राहील.

त्यामुळे काल दि.6 ऑक्टोबर रोजी मराठा क्रांती मोर्चातील काही समन्वयकांनी महायुतीस दिलेला पाठींबा हा त्यांचा वैयक्तिक पाठींबा असून त्या पाठिंब्याशी मराठा क्रांती मोर्चा व मराठा समाजाचा कसलाही संबंध नाही. तसेच काल मराठा समाजाची मिटिंग आहे, असे सांगितल्याने यातील काही समन्वयक तिथे उपस्थित होते. परंतु, त्याचाही ह्या पाठिंब्याशी कसलाही संबंध नव्हता व नाही. तसेच ज्या व्यक्तींना पाठींबा द्यायचा आहे, त्यांनी वैयक्तिक संस्था, संघटनेच्या नावांवर द्यावा. कोणीही मराठा क्रांती मोर्चाच्या नावांवर पाठींबा देवू नये आणि मराठा समाजाला कोणीही गृहीत धरू नये, अशी स्पष्ट भूमिका सर्व मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी घेतलेली आहे. त्यामुळे काल महायुतीस दिलेल्या पाठिंब्याशी मराठा क्रांती मोर्चाचा कोणताही, कसलाही संबंध नाही, असा जाहीर खुलासा आम्ही सर्व समन्वयक या पत्रकार परिषदे व्दारे करीत आहोत.

यावेळी नाना काळे, दिलिप कोल्हे, सुनिल रसाले, ज्ञानेश्वर सपाटे, महादेव गवळी, योगेश पवार, राम जाधव, विजय पोखरकर, प्रशांत बाबर, सुहास कदम, चंद्रकात पवार, गणेश डोंगरे, शिशिर जगदाळे, निशांत सावळे, रतिकांत पाटील, निलेश मोरे, सौदागर क्षीरसागर, भाऊ रोडगे, किरण पवार, सोमनाथ राऊत आदी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here