प्रभाग क्रमांक १९ होतोय टँकरमुक्त

नगरसेवक गुरुशांत धुत्तरगांवकर यांच्या प्रयत्नांना यश

0

By-MH13 News,नेटवर्क

सोलापूरला पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष नेहमी असते. भर पावसाळ्यात हे अनेक ठिकाणी टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. अशावेळी प्रभाग क्रमांक 19 मात्र टँकर मुक्त होतोय यासाठी येथील नगरसेवक गुरुशांत धुत्तरगांवकर यांच्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे.

शिवसेनेचे नगरसेवक गुरुशांत धुत्तरगांवकर यांच्या निधीमधून रफिक नगर मध्ये पिण्याचे पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असून गेल्या पंधरा वर्षांपासून या भागातील रहिवाशांना आठवड्यातून एकदा येणाऱ्या टँकरने पाणी भरावे लागत असे. नगरसेवक गुरुशांत धुत्तरगांवकर यांनी या प्रभागातील बहुतांश भाग टँकरमुक्त करण्याचा विडा उचलला असून महालक्ष्मी नगर नंतर आता रफिक नगर याभागात पिण्याचे पाईपलाईन टाकण्याचे काम त्यांच्या माध्यमातून पूर्णत्वास येत आहे. याबाबत परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here