विमानसेवेसाठी वेकअप फौंडेशन आणि फेसबुक स्नेहींचा एल्गार

सोलापुरातील हवाई वाहतूकीसाठी प्रयत्न करणार

0

By-MH13NEWS,वेबटीम

आपलं सोलापूर विकसित व्हावं यासाठी नेहमी प्रयत्नशील असणाऱ्या वेकअप सोलापुर फाउंडेशन च्या साथीला फेसबुक स्नेही आले असून या दोन्ही संघटनांनी सोलापूरच्या विमान वाहतुकीसाठी सर्व पातळीवर प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला आहे.
यासाठी आज मंगळवारी या संदर्भातील आयोजित बैठकीत सदस्यांनी मांडलेले मुद्दे असे होते की,’सोलापूरच्या विकासातली सर्वात मोठी आणि पहिली अडचण विमानाची आहे हे सर्वांना कळते पण शहराचे दुर्दैव असे की, या शहरात विमान सुरू व्हावे यापेक्षा सुरू होऊ नये यासाठी प्रयत्न करणारांची संख्या जास्त आहे. विमान आणि विमानतळ यासाठी ज्यांनी प्रयत्न करायला हवेत ते उदासीन आहेत. त्यामुळे आता या प्रश्नामागे रेटा लावण्याचा निर्धार वेक अप सोलापूर ग्रुपने केला आहे. ग्रुपला विमानतळापेक्षा विमान सेवा महत्त्वाची वाटते. होटगी रोडवरील विमानतळ आहे त्या स्थितीत ताबडतोब लहान विमानासाठी सुरू करावा आणि बोरामणीच्या विमानतळाच्या उभारणीच्या कामाला गती देऊन तो येत्या दोन वर्षात सुरू करावा असा वेक अप ग्रुपचा आग्रह असेल. शिर्डी, कोल्हापूर, नांदेड ही विमानतळे मागून पुढे गेली. सोलापूरचा रेटा नसल्याने सोलापूर मागे पडले. शहर आणि जिल्ह्याच्या विकासासाठी आग्रही असणाऱ्या लोकांनी वेक अप सोलापूरच्या प्रयत्नांना यथाशक्ती पाठींबा द्यावा. आपण उभे राहिलो तर काहीही शक्य आहे मित्रांनो. गरज आहे फक्त जागे होण्याची.’या एकमुखी विचारांस सर्वांनी एकत्र येऊन पाठिंबा दिला.
याप्रसंगी मिलिंद भोसले, अरविंद म्हेत्रे, अरविंद जोशी, डॉ अरविंद कुंभार, गोविंद काळे, सुहास भोसले, विद्या भोसले, राजेश काथवटे, अमित कामतकर, आनंद पाटील, उपेंद्र ठाकर, शिवाजी सुरवसे, सुरजसिंह राजपूत, नंदू दळवी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here