By-धोंडप्पा नंदे,MH13NEWS
वागदरी परिसरातील शेतकरी आता पुन्हा शेतीच्या कामांकडे वळला आहे. अक्कलकोट तालुक्यात सध्या शेतीच्या कामाला वेग आला आहे. ज्वारीच्या काढण्या सुरू असून शेतात काढलेली कणसे खुडण्याचे काम वेगात सुरू आहे.
महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असलेले वागदरी,भुरिकवठे,गोंगाव,खैराट,किरनळ्ळी,घोळसगांव शिरवळवाडी आदी ग्रामीण भागात प्रामुख्याने ज्वारी,हरभरा,गहू पिकांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं.त्यात पारंपारिक ज्वारी उत्पादन शेतकरी जास्त प्रमाणात घेण्यात कल असतो.
गेल्या वर्षी पाऊस पाहिजे तसा झाला नाही त्यामुळे यंदा ज्वारी उत्पादन दरवर्षी पेक्षा कमी होण्याची शक्यता आहे.
विशेषतः बागायतदार शेतकऱ्यांचा नगदी पिकांकडे जास्त जास्त ओढा असतो.परंतु बाजाराचा आणि ग्राहकांचा कल बघून ज्वारीच्या उत्पादनावर भर दिला असल्याचं प्रगतशील शेतकरी परमेश्वर कणमुसे यांनी सांगितले.