Breaking बिगुल वाजलं : २१ ऑक्टोबरला मतदान तर २४ ऑक्टोबरला निकाल.!

0
MH13News,network
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित करण्यात आल्या आहेत .महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक होणार असून 21 ऑक्टोबरला मतदान होईल तर 24 ऑक्‍टोबरला निकाल देण्यात येईल.अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते पुढे म्हणाले की,” यंदाच्या निवडणुकीत खास सुरक्षा व्यवस्था तैनात केली जाईल. निवडणुकीत पैशांचा गैरवापर टाळण्यासाठी त्यावर लक्ष देण्यासाठी विशेष पथक निर्माण केली जाणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या वतीने देण्यात आली.
या निवडणुकीत प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. उमेदवारांना गुन्हेगारीची माहिती देणे हे बंधनकारक करण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्यात एकूण ८.९४ कोटी मतदार आहेत,तर १.८ लाख ईव्हीएम मशीनचा वापर केला जाणार आहे.
यंदाच्या निवडणुकीत प्रचार करताना उमेदवारांवर २८ लाखांपेक्षा जास्त खर्च करण्यावर बंधन घालण्यात आले आहे. उमेदवारांना 30 दिवसात केलेल्या खर्चाचा हिशोब देणे बंधनकारक आहे.नक्षली भागात, गोंदिया आणि गडचिरोली मध्ये विशेष सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे.
विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ नऊ नोव्हेंबरपर्यंत असेल अशी माहिती निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषदेत दिली.
येत्या 27 सप्टेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 4 ऑक्टोंबर ही अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे .
5 ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल तर 7 ऑक्टोबर पर्यंत माघार घेण्याची मुदत आहे .
एकाच टप्प्यात संपूर्ण महाराष्ट्रात 288 विधानसभा जागांसाठी 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर दिवाळीपूर्वीच 24 ऑक्टोबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील.
आजपासून निवडणूक आदर्श आचार संहिता सुरू झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here