लसस्वी | १२८ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लसीकरण ;जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील…

0
लसीकरण

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व जिल्हा आरोग्य अधिकारी शितलकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये १२८ अधिकारी व कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती दक्षिण सोलापूरचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.दिगंबर गायकवाड यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी आज दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी येथील आरोग्य वर्धिनी केंद्रामध्ये विशेष मोहिमेचे नियोजन करण्यात आले होते.या आरोग्य वर्धिनी केंद्रामध्ये महिला व बाल कल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख , शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) संजयकुमार राठोड , जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.नवनाथ नरळे , जिल्हा कृषी विकास अधिकारी पी.एस.बेंदगुडे , बांधकाम १ चे कार्यकारी अभियंता कदम , बांधकाम २ चे कार्यकारी अभियंता पी.आर.माने , उपशिक्षणाधिकारी संजय जावीर , सुलभा वठारे , शालेय पोषण आहार विभागाचे लेखाधिकारी वैभव राऊत आदीं अधिकारी यांच्यासह १२८ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले तसेच कुंभारी येथील केंद्रामध्ये ७८ व मंद्रुप येथील केंद्रामध्ये ७ आरोग्य विभाग कर्मचारी व पोलीसांना लसीकरण करण्यात आले.यासाठी शासनाच्या पोर्टलवर ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करण्यात आली होती.आज लसीकरण केंद्रासाठी २ अॕम्बुलन्सची सुविधा , पोस्ट वॕक्सीन केंद्र सजावट करुन त्याठिकाणी पाण्याची सुविधा , आरामदायी खुर्च्या , टि.व्ही आदी सुविधा उपलब्ध करण्यात आली.त्यामुळे अधिकारी व कर्मचारी यांनी उत्साहाने लसीकरण करुन घेतले.


यावेळी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षमधील डॉ.ए.सी.मुजावर , सचिन सोनवणे , महादेव शिंदे , प्रशांत दबडे , दिपाली व्हटे , अर्चना कणकी यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.सदरचे लसीकरण तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.दिगंबर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यासाठी होटगी आरोग्य वर्धिनी केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डी.व्ही.मिसाळ , डॉ.बी.के.चव्हाण , डॉ.सरोज पाटील , आरोग्य सहाय्यक झाकीर सय्यद , सुभाष सत्तारवाले , आरोग्य सेविका श्रीमती मुलाणी , चव्हाण यांच्यासह आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here