उर्दू जगातील सर्वात गोड भाषा : महेश गादेकर

0

सोलापूर- जगात जेवढे भाषा बोलले जातात ते त्या-त्या ठिकाणी उत्तम आहे. पण उर्दू भाषा ही जगातील सर्वात गोड भाषा आहे. उर्दूमुळे आपल्या चरित्र निखरते. उर्दूमुळे आपल्या आचरणात तमिज व तहेजीब येते. जेव्हा मी गीतकार गुलजार व जावेद अख्तर भेटलो त्यांच्या आचरणात जे आदरभाव आहे ते केवळ उर्दूमुळे आहे. यामुळे आपल्या फिल्मीसिटीमध्ये भरपूर गाणे उर्दू भाषेतील आहेत, भाषा ही कोणची जागीर नाही, प्रत्येक भाषा सर्वांनी शिकायला पाहिजे, असे उद्गगार महाराष्ट्र शासनातर्फे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त महेश गादेकर यांनी काढले.


खादिमाने उर्दू फोरम, सोलापूरच्या सहाव्या अशरा-ए-उर्दूच्या तिसऱ्या ‘उर्दूत्तर भाषिकांसाठी मोफत उर्दू वर्ग’ या कार्यक्रमाचे उद्घाटन त्यांच्या शुभहस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी फोरमचे अध्यक्ष विकारअहमद शेख होते तर उपाध्यक्ष अय्युब नल्लामंदू, सचिव डॉ. म. शफी चोबदार, अ. मन्नान शेख, इक्बाल बागबान आदी उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात विकारअहमद शेख म्हणाले की, उर्दू ही कोणत्याही जाती धर्माची भाषा नसून ते उर्दू भाषा प्रत्येकांनी शिकायला पाहिजे. उर्दूमुळे आपल्या समाजात जे दरी ते दूर व्हायला पाहिजे. उर्दूचे सर्वात जास्त काम आपल्या महाराष्ट्रात झालेले आहे. बॉलिवुडमध्ये उर्दू भरपूर बोली जाते. आपल्या वर्गामध्ये जे विद्यार्थी शिकायला येतो त्यांना विचार असता त्यांनी असे सांगितले आम्हाला गीत, गजल, नगमे समजण्यासाठी आम्ही ही भाषा शिकत आहोत.
प्रास्ताविका महेमूदनवाज यांनी खादिमाने उर्दू फोरमच्या वेगवेगळ्या चालविल्या जाणाऱ्या कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली. यावेळी अन्वर कमिशनर, म. रफीक खान, बशीर बागबान, डॉ. आयेशा पठाण आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. म. शफी चोबदार यांनी केले तर आभार अ. मन्नान शेख यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here