माढा परिसरात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस ; शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

0

शेखर म्हेञे /माढा प्रतिनिधी

कालच वेधशाळेने येत्या चार -पाच दिवसात महाराष्ट्रातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे सुचित केले होते. त्याप्रमाणे माढा शहरात आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून वीजाच्या कडकडाट व मेघगर्जनासह मुसळधार पाऊसाला सुरवात झाली आहे. त्यामुळे माढा व परिसरातील शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.

उंदरगाव येथे काही द्राक्ष बागेचे नुकसान झाल्याचे समजते. या अवकाळी पाऊस मुळे ज्वारी, गहू द्राक्षे, आंबा,जांभुळ या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आधीच कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी अडचणीत सापडला असता या आवकाळी पाऊसाने शेतकरी वर्गाचे कंबरडे मोडले आहे. पाऊस व वाऱ्यामुळे माढा शहरातील विद्युत पुरवठा काही काळ खंडीत झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here