Breaking | पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठातल्या स्मारकावरुन नवा वाद ; धनगर समाज आक्रमक.!

0

पुण्यश्लोक अहिल्यादेवी मॉंसाहेबांचे पवित्र नाव लाभलेले विद्यापीठ राजकारणाचा अड्डा होऊ देणार नाही”- स्मारक समितीच्या निर्णयाविरोधात धनगर समाज आक्रमक

पंढरपूर- सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठातल्या स्मारकावरुन नवा वाद उफाळला आहे. धनगर समाजाचे नेते विरुद्ध विद्यापीठ प्रशासन असा संघर्ष आता पहायला मिळतो आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकावरुन वाद चिघळण्याची चिन्ह आहेत. महाविकास आघाडीच सरकार स्थापन होऊन दोन वर्ष झाली तरी विद्यापीठातल्या स्मारकाविषयी निर्णय होत नव्हता. याआधी स्थापन करण्यात आलेल्या समितीतल्या महत्त्वाच्या नेत्यांना काढण्यात आलं. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना स्मारक समितीवर घेतल्यानंतर वाद आणखी वाढला होता. ती परिस्थीती मिटायच्या आत अहिल्यादेवींच्या हाती शिवलिंग असलेला पुतळा बसवण्याचा निर्णय स्मारक समितीने घेतला आहे. याला धनगर समाजाचा विरोध आहे.

का आहे विरोध?

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा लढवय्या बाण्यातला अश्वारुढ पुतळा विद्यापीठात स्थापित केल्यास समस्त बहुजन समाजाला संघर्षाची प्रेरणा मिळेल असं नेत्यांच मत आहे. उत्तम प्रशासक म्हणून राज्यावर असणारी वचक, पेशव्यांपासून ते शिंदेंचा पराभव इंग्रजांसोबत दाखवलेली मुत्सद्देगिरी या महत्त्वपुर्ण ऐतहासिक बाबी जनतेसमोर याव्यात यासाठी अश्वारुढ पुतळा हवा अशी मागणी जोर धरते आहे.

“गेली अनेक दशकं सातत्यपूर्ण संघर्ष केल्यानंतर सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव मिळालं. स्त्री सशक्तीकरणाच मुर्तीमंत उदाहरण म्हणजे अहिल्यादेवी मॉंसाहेब त्यांच्याकडून फक्त धनगर समाजानं नाही तर संपूर्ण जगानं विशेषतः स्त्रीयांनी शिकवण घ्यावी असं त्यांच जीवन होतं. त्यामुळं त्यांना पुजापाठापुरतं मर्यादित ठेवणारा शिवलिंगधारी पुतळा बसवण्याऐवजी पुर्णाकृती अश्वारुढ पुतळा बसवण्यात यावा अशी मागणी आम्ही समाजाच्यावतीने करत आहोत. रोहित पवारांनी समितीवर आल्यापासून दुधात मिठाचा खडा कालवण्याच काम सुरु केलं आहे. होळकरांच्या वंशजांना समितीवरुन काढलं, इतिहासातली तसुभर माहिती नसणाऱ्यांना स्मारक समितीवर घेतलं. हे वेळत थांबवले पाहिजे. अहिल्यादेवी मॉंसाहेबांचे पवित्र नाव लाभलेले विद्यापीठ राजकारणाचा अड्डा होऊ देणार नाही” अशी आक्रमक भूमिका शिवाजीराव बंडगर ,अर्जुन सलगर यांनी घेतली आहे.

मागच्या समितीनं घेतला होता अश्वारुढ पुतळा बसवण्याचा निर्णय

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात अहिल्यादेवी होळकर यांचं स्मारक बसवण्यासाठी समिती गठित करण्यात आली होती. या समितीने अश्वारुढ पुतळा बसवण्याच मान्य केलं होतं. काही महिन्यांपूर्वी मागची समिती बरखास्त करत नवी समिती गठित झाली. रोहित पवारांचा यात समावेश झाला. यातल्या काही सदस्यांनी स्वतःहून राजीनामे घ्या अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मगाच्या समितीने घेतलेला निर्णय बदलत अचानक अहिल्यादेवींचा पुतळा बदलण्याचा घेतलेला निर्णय धनगर समाजासाठी आश्चर्यकारक आहे.

७ सप्टेंबरला बोलावली बैठक

विद्यापीठ प्रशासन आणि राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात भूमिका ठरवण्यासाठी सोलापूरात मंगळवारी ७ सप्टेंबरला निर्णय घेण्यासाठी बैठक बोलवण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here