गोविंदा.. गोविंदा.. ! उध्दव ठाकरेच हिंदुत्वाचे खरे पुरस्कर्ते : पुरुषोत्तम बरडे

0

सोलापूर :- कसलाही गाजावाजा न करता नेहमीच सर्वांना सोबत घेऊन जात हिंदुत्वाची कास कधीच न सोडणारे उध्दव ठाकरे हेच खरे हिंदुत्वाचे पुरस्कर्ते आहेत. राजकारणासाठी हिंदुत्वाचा वापर करणारे इतर नेते तोतया हिंदू नेते आहेत, जे जाती-धर्मात तेढ निर्माण करुन स्वतःची पोळी भाजून घेण्यात धन्यता मानतात असे मत शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी व्यक्त केले.
तिरुमला तिरुपती देवस्थानला महाराष्ट्रात भव्य मंदिर उभारता यावे याकरिता नवी मुंबईतील दहा एकर जागा देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला. याबद्दल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह ना. आदित्य ठाकरे, तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टचे संचालक तथा शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानण्यासाठी व आंध्रप्रदेशातील तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टींचे महाराष्ट्रात स्वागत करण्याच्या हेतूने सोलापुरातील दाजी पेठेत असणाऱ्या श्री व्यंकटेश्वर देवस्थान येथे शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या हस्ते महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी बरडे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, हिंदुस्थानचे श्रध्दास्थान असणाऱ्या व्यंकटेश्वर बालाजीचे भव्य मंदिर मुंबईत उभारल्यानंतर पुढच्या शंभर वर्षानंतर सुध्दा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सूपुत्राने घेतलेल्या निर्णयाचे कौतुक होत राहील.
याप्रसंगी बोलताना शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगांवकर म्हणाले, संपूर्ण देशातून तिरुपती दर्शनाला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. विशेषतः महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात वसलेला तेलुगू भाषिक समाज वर्षातून एकदा तरी दर्शनासाठी तिरुमला येते जात असतो. साक्षात देवच भक्तांच्या भेटीसाठी जणू जवळ येतोय म्हटल्यास वावगे ठरणार नाही. यामुळे पर्यटन विकासाला देखील चालना मिळेल.


याप्रसंगी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तमजी बरडे साहेब, शिवसेना शहरप्रमुख गुरुशांत दादा धुत्तरगांवकर, महिला आघाडी जिल्हा संघटिका अस्मिता गायकवाड, उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय पंत वानकर, प्रताप भाऊ चव्हाण, संतोष पाटील, प्रा. अजय दासरी, विष्णू महाराज कारमपुरी, भारतसिंग बडुरवाले, महेश धाराशिवकर, विजय पुकाळे, विद्यार्थी सेनेचे लहू गायकवाड, तुषार तुषार रमेश आवताडे, अक्कलकोटचे आनंद बुक्कानुरे, योगेश पवार, उपशहरप्रमुख बाळासाहेब अशोक गायकवाड, संताजी भोळे, मलिक हब्बू, भागवत जोगदनकर, रेवण बुक्कानुरे, निरंजन बोध्दुल, शेखर इराबत्ती, धनराज धनराज नाना जानकर, सुरेश जगताप, सोमनाथ शिंदे, दिनेश चव्हाण, राम वाकसे, बाळासाहेब माने, सिध्दाराम खजुरगी, सचिन गंधुरे, राहुल गंधुरे, जयराम सुंचू, अमर बोडा, बालाजी प्रभाकर चौगुले, रोहित तडवळकर, बालाजी विठ्ठलकर, ॲड. मुनीनाथ कारमपुरी, अनिल गायकवाड, अमित भोसले, रेवण पुराणिक, संजय गवळी, रविकांत गायकवाड, सुशील कन्नुरे, ब्रह्मदेव गायकवाड, विश्वनाथ अलकुंटे, प्रेम सातलगांव, मल्लिकार्जुन सातलगांव, योगेश होनमुटे, महेश गिराम, प्रशांत कदम, गजेंद्र माशाळे, नागेश सोलनकर, अभिजित जाधव, पवन दुबे, श्रीनिवास पोतु, अनिल चिंताकिंदी, गजानन केंगनाळकर, श्रीनिवास पोतु, राज पांढरे व बसवराज जमखंडी आदी उपस्थित होते.

 

श्री व्यंकटेश्वर देवस्थान, दाजी पेठ, सोलापूरचे अध्यक्ष जयेंद्र द्यावनपल्ली, उपाध्यक्ष रायलिंग आडम, सेक्रेटरी राजेशम येमुल, व्यवस्थापक रापेल्ली, श्रीनिवास बोध्दुल व श्रीनिवास गाली आदींसह पौरोहित्य करणाऱ्या पुरोहितांनी अर्चना व महाआरती करण्यासाठी शिवसेनेला विशेष सहकार्य केले.

 

गोविंदा SSS गोविंदा..

गळ्यात भगवे उपरणे व डोक्यावर भगवा फेटा किंवि भगवी टोपी परिधान करुन नेहमी जय भवानी, जय शिवाजी , छत्रपती शिवाजी महाराज की जय, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो, आवाज कुणाचा.. शिवसेनेचा अशा घोषणा देणाऱ्या शिवसैनिकांनी आज या साऱ्या घोषणांसोबतच ‘गोविंदा गोविंदा, व्यंकटरमण गोविंदा’ या जयघोषाने परिसर दणाणून सोडला होता. त्याला ढोली बाजाची साथही होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here