प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हा परिषदेला तिरंगी रंगांची रोषणाई

0

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सोलापूर जिल्हा परिषद इमारतींला तिरंगी रंगांची रोषणाई

सोलापूर – २६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा परिषद मुख्यालय इमारतीवर तिरंगा ध्वजाची रोषणाई करण्यात आली आहे .सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे संकल्पनेतून दरवर्षी राष्ट्रीय सणा निमित्त २६ जानेवारी , १५ ऑगस्ट व १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हा परिषद मुख्यालय इमारतीवर तिरंगा रोषणाई करण्याचा उपक्रम सुरु केला आहे. आज सिईओ दिलीप स्वामी व ग्रामपंचायत व प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी पाहणी केली.


जिल्हा परिषदेचे इमारतीचे परिसरांत करणेत आलेल्या वृक्ष वेली देखील या दिमाखदार रोषणाईने उजळून निघाले आहेत.


यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद मुख्यालय इमारत राष्ट्रध्वजाच्या तिरंगा रंगाने न्हाऊन निघाली आहे. डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या या रोषणाईला सोलापूरकरानी आपल्या कॅमेरामध्ये कैद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here