माढ्यातील ट्रॅक्‍टर चालकाचा मृत्यू; पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल

1

(वेब,टीम/माढा)

बबनरावजी शिंदे शुगर ॲन्‍ड अलाईड साखर कारखान्याला ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्‍टर वाहन चालकाचा आकस्‍मित मृत्यू झाला. प्रदीप कल्याण कुटे (वय २४) असे मृताचे नाव असून तो उस्‍मानाबाद जिल्‍ह्यातील सोनगिरी (ता.भूम) येथील रहिवासी आहे. मानेगाव येथील या घटनेनंतर प्रदीपच्या नातेवाईकांनी पोलिस मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप करत माढा पोलिस ठाण्याच्या आवारात ठिय्‍या मारला आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मृत प्रदीप कुटे हा धानोरे ता. माढा येथून ट्रॅक्‍टर गाडीत ऊस घेऊन बबनरावजी शिंदे शुगर केवड तुर्क पिंपरी येथील कारखान्याकडे जात होता. दुपारी तीनच्या सुमारास मानेगाव येथील (औट पोस्ट)पोलिस चौकीसमोर ट्रॅक्‍टर आला असता पोलिसांनी टेपच्या आवाजावरून प्रदीपला हटकले. त्यानंतर त्यावरून प्रदीपला मारहाण केली. यावेळी प्रदीपची आई ट्रॅक्‍टर मागे असलेल्या उसाच्या गाडीत बसल्या होत्या.

मारहाणीत जखमी झालेल्या प्रदीप याला माढ्याच्या ग्रामीण रुग्‍णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, तत्‍पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी जाहीर केले त्यानुसार माढा पोलिसांत आकस्‍मित मृत्यूची नोंद करण्यात आली.

मृताच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या मारहाणीतच प्रदीपचा मृत्यू झाल्याचा आरोप केला. तसेच संबंधित पोलिसांवर गुन्‍हा दाखल करण्याची मागणी केली. उपविभागीय पोलिस अधिकारी पाटील यांनी घटनास्‍थळी भेट दिली. त्यानंतर उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

सहा महिन्यांपूर्वीच झाला मृताचा विवाह

दरम्यान, मृत प्रदीप कुटे याचा सहा महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता, असे नातेवाईकांनी सांगितले. त्याच्या पश्चात पत्‍नी, आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे.

1 COMMENT

  1. जिल्हा क्रीडा संकुल कुमठा नाका सोलापूर येथे सन २००३ ते २०१७ पर्यंत महिना ४००० ₹मानधनावर ८ कर्मचारी कार्यरत होते.२०१४ मधे महाराष्ट्रातील सर्व मानधन कर्मचार्यांनी कामावर कायम करण्यासाठी नागपूर येथे केस दाखल केली होती.त्या अनुषंगाने मा.कामगार न्यायालयाने सदर कर्मचारी यांना निकाल लागेपर्यंत कामावरून कमी करू नये अशी स्टे आर्डर दिली होती असे असताना जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज वसंत नाईक यांनी सर्व मानधन कर्मचार्यांना कामावरून कमी करून त्यांच्या ठिकाणी दुसऱ्या कर्मचार्यांना ₹९००० इतक्या मानधनावर नियुक्त केले आहे.त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून प्रति महिना ४०००० ₹ शासनाचे नुकसान होत आहे.मा.जिल्हा अधिकारी सोशल मीडिया पत्रकार बंधुं तसेच सर्व वृत्त़पत्र यांना विनंती कामगारांना न्याय मिळवून द्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here