दुष्काळ गंभीर..शिवसेना खंबीर :आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उद्या ‘सारोळे’त .!

गरजू शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी चारा, पाण्याच्या टाक्यांचे होणार वाटप - गणेश वानकर,जिल्हाप्रमुख

0

By- MH13 NEWS,वेब/टीम

युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे सोलापूर दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यातील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या हस्ते मोहोळ तालुक्यातील गरजू शेतकऱ्यांशी संवाद व त्यांच्या जनावरांसाठी चारा आणि गावासाठी पाण्याच्या टाक्यांचे वाटप करण्याचा कार्यक्रम उद्या मंगळवार १२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता ” सारोळे ” या गावात होणार  असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

सोलापूर जिल्हा भीषण दुष्काळाचा सामना करत आहे. जनावरांना चार आणि पाण्याची अडचण निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना शेतीबरोबरच आपली जनावरे कशी जगवायची याची चिंता लागून राहिली आहे. दुष्काळामुळे आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्येसारखे पाऊल उचलत आहे. शासनाने राज्यात दुष्काळ जाहीर केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील ११ पैकी ९ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून २ गावे दुष्काळापासून वंचित ठेवल्याचे समजते. ज्या तालुक्यांना शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे त्या तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्याप मदत पोहोचलेली नाही. एकूणच सरकारला आणि जिल्हा प्रशासनाला दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांची कसलीच चिंता राहिली नसल्याचे दिसून येत आहे . शेतकऱ्यांची जनावरे चारा आणि पाण्याविना तडफडत आहेत. दुष्काळ सोलापूर जिल्ह्यात ” आ ” वासून उभारला असताना प्रशासन मात्र चारा छावण्या सुरु करण्यात वेळ दवडत आहे. मुकी जनावरे तडफडून मेल्यानंतर जनावरांना चार मिळणार आहे काय ? असा प्रश्नही जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी उपस्थित केला.
खऱ्या अर्थाने महाराष्ट्र सदन आहे. अशा सदन महाराष्ट्रात अन्नदाता शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणे म्हणजे महाराष्ट्रासाठी काळिमा फासणारी घटना आहे. जगाचा पोशींदा शेतकरी जगला तरच आपण जगणार आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्येकडे वळू नये आणि शेतकऱ्यांनी आत्महत्येपासून परावृत्त होण्यासाठी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ” दुष्काळ गंभीर, शिवसेना खंबीर “असा नारा देत दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावून येण्यासाठी दुष्काळी भागाचा दौरा हाती घेतला आहे. मोहोळ तालुक्यातील सारोळे गावात एखादे दुसरे जनावर असलेल्या अत्यंत गरजू शेतकऱ्यांची यादी संबंधित युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांमार्फत मागविण्यात आली . त्यांना मंगळवारी सकाळी १० वाजता सारोळे गावात युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते जनावरांसाठी चारा वाटप करण्यात येणार असल्याचे जिल्हाप्रमुख वानकर यांनी सांगितले.


या पत्रकार परिषदेला दीपक गायकवाड,काका देशमुख,विठ्ठल वानकर,विक्रांत काकडे,अशोक भोसले,शहाजी भोसले,नागेश व्हनकळस,रणजित गायकवाड, मनीष काळजे,सुमित साळुंखे, बालाजी चौगुले, बापू भोसले, उपस्थित होते.

या गावांना होणार पाण्याच्या टाक्याचे वाटप

मोहोळ तालुक्यातील अनेक गावांना पाण्याची टंचाई भासत आहे. त्यामुळे युवा सेनेच्यावतीने हराळवाडी , गायकवाड वस्ती, भांबेवाडी,पोखरापूर, पारधी वस्ती, सारोळे, डिकसळ, कोन्हेरी, मसाले चौधरी, बागवान नगर,नरखेड, खवणी आणि पेनूर या गावांना पाण्याच्या टाक्यांचे वाटप होणार आहे.

 या गरजू बळीराजाला मिळणार जनावरांसाठी चारा 
नजीक पिंपरी , पोखरापूर , खवणी , सारोळे , कोन्हेरी ,देवडी ,वाफळे ,हिवरे , यावली ,खुनेश्वर , मनगोळी ,वाळूज , यल्लमवाडी ,डिकसळ ,मसले चौधरी ,हिंगणी ,मोरवंची , पारधी वस्ती ,कोथाळे ,वाढेगाव , चिखली आणि ढेकळेवाडी येथील लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांसाठी चारा वाटप करण्यात येणार असल्याची माहिती या पत्रकार परिषदेत दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here