प्रियकराच्या छळास कंटाळून विवाहितेने घेतला गळफास

0

MH 13 News Network

प्रियकराच्या छळास कंटाळून विवाहितेने घेतला गळफास

सोलापुरातील एका विवाहितेने प्रियकराच्या होणाऱ्या सततच्या त्रासास आणि छळास कंटाळून गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबतची अधिकची माहिती अशी…
कविता कल्याणम वयवर्षे 32 राहणार जुना विडी घरकुल,सोलापूर असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. गेल्या दोन वर्षांपासून कविता कल्याणम हिचे त्याच परिसरात राहणाऱ्या संदीप राठोड याच्याशी प्रेम जुळले होते. सदर प्रकरण मागील दोन वर्षापासून सुरू होते.

आपल्या पत्नीचे प्रेम प्रकरण संदीप सोबत आहे हे कळल्यानंतर पतीने पत्नीला समज देत अशी घटना पुन्हा होऊ नये अशी ताकीद दिली होती. त्यानंतर दोघातील प्रेम प्रकरण संपुष्टात आले होते. मात्र प्रियकर संदीप राठोड हा मयत कवितेचा हिचा पिच्छा सोडत नव्हता.

संदीप हा मयत कल्याणमला वारंवार त्रास देत होता. याच त्रासाला आणि छळाला कंटाळून आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल कवितेला उचलावं लागले .कविता कल्याणम हिने राहत्या घरामध्ये सकाळी साडेसहा वाजता गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

दरम्यान, याबाबत कल्याणम यांचे नातेवाईक शेजारी तसेच रुग्णसेवक रुपेश कुमार भोसले यांनी अधिक माहिती देताना सदर घटना घडवून देखील एक दिवस उलटला तरीही अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही असे सांगत एम आय डी सी पोलिसांनी तात्काळ तपास करून आरोपीला अटक करावी अशी मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here