Accident | चारचाकी वाहनाच्या पुढच्या भागाचा अक्षरशः भुगा ; मार्केटयार्ड परिसरात तिघांचा जागीच मृत्यू

0

सोलापूर – हैदराबाद रोड वरील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात मोठा भीषण अपघात झाला असून तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर अन्य काही जण गंभीर जखमी आहेत.

ईनोवा गाडीचा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी पाहणार्‍या लोकांचे म्हणणे आहे.
सोलापूर हैदराबाद रोड वरील मार्केट यार्ड परिसरातील सर्व्हिस रोडजवळ हा अपघात झाला. दोन क्रेनच्या साह्याने मृतदेह बाहेर काढण्यात येत आहेत. नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. बघ्यांना हटवण्याचे काम जोरात सुरू आहे.

मार्केट यार्ड परिसरात डाव्या बाजूला थांबलेल्या एका ट्रकला भरधाव वेगाने ईनोवा गाडीने धडक दिली त्यामुळे अपघात झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. यामध्ये ईनोवा गाडी च्या पुढच्या भागाचा अक्षरशः भुगा झाला असून अर्ध्यापेक्षा अधिक गाडीचा चक्काचूर झाला आहे.

पुणे ते हुबळी असा या गाडीचा प्रवास होता अशी माहिती मिळाली आहे. तिघांचा जागीच मृत्यू झाला असून त्यात ड्रायव्हर आणि त्याच्यासोबतचे दोघे त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. मदत कार्य पोलीस युद्धपातळीवर करत आहेत. इतर काही जणांची  प्रकृती गंभीर आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.

बातमी सतत अपडेट होत राहील..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here