‘बाबासाहेबां’चे स्मरण हेच खरे अभिवादन :आनंद चंदनशिवे

0

MH13 NEWS Network

विश्वरत्न डॉ. आंबेडकर यांचे नातू प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या चला सोलापूरकर साथ देऊ… डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरोघरी साजरी करू..! बाबासाहेबांचे स्मरण हेच खरे अभिवादन असणार आहे असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते आनंद चंदनशिवे यांनी केलं आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन व संचारबंदी लागू असून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 129 वी जयंती समाजातील गोरगरीब व हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांना अन्नधान्य व घरगुती लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंची भेट देऊन यावर्षी सोलापूरकर साजरी करतील व विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवाराने दिलेल्या आदेशाचे पालन करून यंदाच्या वर्षी जयंती उत्सव साजरा करावा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे गटनेते नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here