आता…सोलापूर जिल्ह्यात ‘या दोन’ नव्या एमआयडीसी

0
मुंबईदि. 11 : सोलापूर जिल्ह्यातील मौजे मोडनिंब व माढा या ठिकाणी नव्याने एमआयडीसी निर्माण झाल्यास रोजगाराची संधी उपलब्ध होईल. यासाठी मौजे मोडनिंब व माढा येथे एमआयडीसी निर्माण करण्यासाठी लवकरात लवकर कार्यवाही करा, असे निर्देश  राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.
 
यावेळी बैठकीत औद्योगिक क्षेत्रासाठी पा पुरवठा तसेच इन्फ्रास्ट्रक्चर रेट गृहीत धरून याबाबत प्रस्ताव शासनास सादर करावाअसेही यावेळी श्रीमती तटकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.
 
बैठकीला आमदार बबनराव वि. शिंदेमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदारउपअभियंता सुनिल चि. कोलपभूसंपादनचे महाव्यवस्थापक गोपीनाथ ठोंबरे आदी अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here