‘या’ हप्त्यांची वसुली नाही ; SBI, PNB चा ग्राहकांना मोठा दिलासा

0

MH13NEWS Network

आरबीआयच्या आवाहनानंतर सरकारी बँकांबरोबर आता खासगी बँकांनीही आपल्या ग्राहकांच्या कर्जावरील ईएमआय तीन महिन्यांपर्यंत स्थगित केले आहेत. सरकारी बँका थेट दिलासा देत आहेत. तर खासगी बँका या सुविधा ‘ऑन डिमांड’ (मागणीनुसार) देत आहेत. म्हणजेच मॉरेटियमचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांना आपल्या बँकांना ई-मेल करुन या सुविधेचा लाभ घेऊ इच्छित असल्याचे सांगावे लागेल. तर आयसीआयसीआय बँकेही काही कर्जांवर सवलत देणार आहे. यावर त्यांचे काम सुरु आहे. आयडीबीआयकडून याप्रकरणी थोडासा दिलासा देण्यात आला आहे. आयडीएफसीच्या ग्राहकांना ई-मेल करुन याची मागणी करावी लागेल.

बँक ऑफ बडोदाने १ मार्च, २०२० पासून ३१ मे २०२० दरम्यान येणारे कॉर्पोरेट, एमएसएमई, कृषी, रिटेल, गृह, वाहन, वैयक्तिक कर्जासह इतर सर्व कर्जांच्या हफ्ते तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्याची घोषणा केली आहे. तर यूनियन बँकेनेही तीन महिन्यांचे हप्ते/व्याज तीन महिन्यांसाठी पुढे ढकलला आहे. तेही १ मार्च २०२० ते ३१ मे २०२० दरम्यानही सुविधा देणार आहेत.

पीएनबी व्याज घेणार नाही

पंजाब नॅशनल बँकेने टि्वट करुन म्हटले की, कोरोना विषाणूमुळे १ मार्च २०२० ते ३१ मे २०२० पर्यंतचे सर्व मुदत कर्जाचे सर्व हप्ते आणि रोख कर्ज सुविधेवर व्याज न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तर स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की, १ मार्च २०२० ते ३१ मे २०२० पर्यंतचे ईएमआय स्थगित करण्याचा बँकेने निर्णय घेण्यात आला आहे. तर याच कालावधीत वर्किंग कॅपिटल सुविधेवरील व्याज ३० जून २०२० पर्यंत टाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here