पदवीधर, शिक्षक मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांचा विजय निश्चित- आ. विजयकुमार देशमुख

0

एकदिलाने आणि एकजुटीनं काम करण्याचं नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना आवाहन

पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघातील निवडणूकीच्या अनुषंगाने आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या प्रमुख उपस्थितीत साखर पेठेतील हिंगुलांबिका सांस्कृतिक भवन येथे बैठक आयोजित केली होती. या वेळी व्यासपीठावर शहर अध्यक्ष विक्रम देशमुख,सरचिटणीस बिज्जू प्रधाने, परिवहन सभापती जय साळुंखे ,मंडळ अध्यक्ष सचिन कुलकर्णी,प्रशांत फत्तेपुरकर,सुधाकर नराल, आदि उपस्थित होते.

गेल्या दोन्ही पदवीधर विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रकांत दादा पाटील हे विजयी झालेले आहेत. या निवडणुकीतही पदवीधर विधान परिषदेची जागा पुन्हा भाजपकडे ठेवण्यासाठी आणि शिक्षक परिषदेची जागा भाजपकडे खेचून आणण्यासाठी सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी एकदिलाने आणि नियोजनपूर्वक काम केल्यास आपला विजय निश्चित असल्याचे मत आमदार विजयकुमार देशमुख यांनी यावेळी मार्गदर्शन करताना व्यक्त केलं.

या बैठकीत दोन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी घेण्याचा निर्धार करण्यात आला.यावेळी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here