मोठी बातमी | परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय ; घेतला जाणार जिल्हानिहाय आढावा …

0
MH13 NEWS Network
राज्यातील काही जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता स्थानिक प्रशासनाने जिल्ह्याच्या परिस्थितीनुसार दि.१ मार्च २०२१ पासून आवश्यकता भासल्यास व परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत काही काळ शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा, असे निर्देश देण्यात येत आहेत.अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली .राज्यात ठिकठिकाणी कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये संसर्गित होण्याचे प्रमाण लक्षणीय होत आहे या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो.
स्वच्छता व निर्जंतुकीकरण कार्यवाही…
विद्यार्थी व शिक्षक यांची सुरक्षितता याला सर्वोच्च प्राधान्य आहे. ज्या शाळांमध्ये कोरोना प्रादुर्भाव आढळून आला आहे; तिथे आवश्यक स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही करण्याबाबत स्थानिक प्रशासनास सूचना देण्यात आल्या आहेत.
कोरोनाचा जिल्हानिहाय आढावा
राज्यात काही जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थी व शिक्षकांत कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता मी, समाजकल्याण मंत्री व आदिवासी मंत्री, कल्याण विभाग यांच्याशी चर्चा करत आहे. याबाबत राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकारी यांच्याकडून जिल्हानिहाय आढावा घेण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here