आंदोलनाचं ‘आंगण तुमचं तर रणांगण’ आमचं – शिवसेना जिल्हा प्रमुख

0

MH13 NEWS Network

भारतीय भारतीय जनता पार्टीचे तथाकथित नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी सरकारला काळे झेंडे दाखवा, काळे मास्क लावा हे आंदोलन केलं आहे हे नीच मनोवृत्तीचे दर्शन आहे अशी खरमरीत टीका सोलापुरातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी आजच्या आंदोलनात केली.यावेळी सोशल डिस्टन्स पाळून आंदोलन करण्यात आले.

यावेळी आशुतोष बरडे , प्रताप चव्हाण , सुरेश जगताप, समर्थप्रसाद बरडे , अमर चौगुले , नरेश चव्हाण , रवींद्र कारंजे , सचिन पाटील , रितेश कल्याणशेट्टी, मंगेश क्षीरसागर , राज पांढरे , संदीप भोसले, दत्ता देशमुख, अजय अमनूर , संभाजी कोडगे, लक्ष्मण शिंदे , आकाश भगरे ,संजय गवळी आदी उपस्थित होते.

शिवसेना जिल्हाप्रमुख बरडे पुढे म्हणाले की…
संपूर्ण मानव जात कोरोनाच्या लढ्यात लढत आहे. पंतप्रधान मोदींचा प्रत्येक आदेश महाराष्ट्रातील सर्व जनतेने आणि सरकारने पाळला, मात्र सत्तेविना तडफडणारे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी हे नीच मनोवृत्तीचं आंदोलन घेतलं आहे. उद्धव ठाकरे सरकारांना हातात हात घेउन मदत करण्याऐवजी पायात पाय घालून कशापद्धतीने पडायचं असं कारस्थान गेले महिनाभर आपण बघत आहोत अशी जहाल टीका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी केली.

एक खासदार दोन आमदार, महापौर-उपमहापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष पासून ते 52 नगरसेवक भाजपाचे आहेत. संपूर्ण जिल्ह्यात तुमचं सरकार असताना कोरोनाचे रोज रुग्ण वाढत आहे. 500च्या पुढे आज बाधित रुग्णांचा आकडा गेला आहे. गेल्या 60 ते 65 दिवसांमध्ये खासदार दिसत नाही. आमदार दिसत नाही, नगरसेवक दिसत नाहीत, महापौर-उपमहापौर दिसत नाहीत, आमच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी हे तुम्ही आंदोलन घेतलं. पुढच्या वेळी अंगण तुमचं रणांगण आमचं असेल असा इशाराही यावेळी पुरुषोत्तम बरडे यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here