मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीचा अजून निर्णय नाही ; सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव

0
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती करावी असा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाने दुस-यांदा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवला आहे.मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून यावरून राज्यात सुरू असलेल्या राजकारणाची माहिती देत नाराजी व्यक्त केल्याचे समजते.

यामध्ये मध्यस्थी केली नाही,तर मला राजीनामा द्यावा लागेल..
मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधानांशी फोनवर चर्चा केली आहे की
यामध्ये मध्यस्थी केली नाही,तर मला राजीनामा द्यावा लागेल.आमदारकीच्या मुद्यावरून राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असून,यामध्ये मध्यस्थी केली नाही,तर मला राजीनामा द्यावा लागेल, असा इशारा ठाकरे यांनी पंतप्रधानांना दिला असल्याची चर्चा आहे.या मध्ये आपण लक्ष घालू असे आश्वासन पंतप्रधान यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिले असल्याचे वृत्त एका वृत्त संस्थेने दिले आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्या विधान परिषद नियुक्तीवर राज्यपाल कोश्यारी यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याने राजकीय वर्तुळात नाराजीचा सुर आहे. मात्र दुसरीकडे समाज माध्यामातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्यपाल नियुक्त आमदारकीबद्दल त्यांच्यावर अभिमंदनाचा वर्षाव सुरू होता.फेसबुक, ट्विटर आदी समाज माध्यमातून मुख्यमंत्र्यांचे अभिमंदन करण्यात येत होते.
काल दिवसभर सुरू असलेल्या अभिनंदनाच्या शुभेच्छामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.काही ठिकाणी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे फोटो शेअर करून अभिनंदन करण्यात येत होते. हा अभिनंदनाचा वर्षाव रात्री उशीरापर्यंत सुरू होता.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधीमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसल्याने त्यांना येत्या २७ मेपर्यंत दोन्ही पैकी एका सभागृहाचे सदस्य व्हावे लागणार आहे.
राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीमुळे विधानपरिषदेच्या निवडणूका लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत.सध्या राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या दोन जागा रिक्त आहेत. त्यापैकी एका जागेवर मुख्यमंत्री ठाकरे यांची नियुक्ती करावी अशी शिफारस दुस-यांदा करूनही राज्यपालांनी त्यावर कोणताच निर्णय घेतला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here