MH 13 News Network
बनावट कुळमुखात्यारपत्राने अनेक प्लॉटस विक्री, महिलेचा अटकपूर्व फेटाळला
सोलापूर: मंजरेवाडी जुळे सोलापूर मधील जमिनीचे सायण्णा शागालोलु बरोबर संगनमत करून कधीही रद्द न होणारे बनावट कुलमुखत्यारपत्र तयार करून अनेक लोकांना प्लॉट विक्री करून फिर्यादीची फसवणूक व लाखो रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी कल्पना प्रकाश मोतीवाले वय 42 रा. लष्कर सोलापूर हीचा अटकपूर्व जामीन अर्ज मे. मुंबई उच्च न्यायालय( एन.आर. बोरकर ) यांनी फेटाळला.
यात हकीकत अशी की, सोलापूर महानगपालिका हद्ववाढ भागातील मंजरेवाडी येथील जुना सर्वे नंबर 303/2/1 B चा नवीन सर्वे नंबर 113/2/1 B /1 ही जमीन फिर्यादी मिरा हनुमंत कांबळे उर्फ मीरा शागलोलु हिस वारसा हक्काने मिळालेली आहे त्यामध्ये फिर्यादीचा सामाईक मालकी हक्क आहे. तिचे नावाची वर नमूद मिळकतीचे सात बारा उताऱ्यावर फेरफार नोंद क्र. 18834 प्रमाणे नोंद झालेली आहे. फिर्यादीचे नातेवाईक कल्पना प्रकाश मोतीवाले हिने साय्याना शागालोलु याच्याशी संगनमत करून फिर्यादी ही वयस्कर असल्याचा व अशिक्षित असल्याचा गैरफायदा घेऊन दि. 02/08/1993 रोजीचे कधीही रद्द न होणारे बनावट कुलमुखत्यारपत्र तयार करून व त्यावर फिर्यादीची व फिर्यादीची बहिण छायाबाई यांची बनावट व खोटी सही करून बनावट कुळमुखत्यारपत्र तयार करून त्यासोबत खोटे घोषणा पत्र बनवून विविध खरेदीखताची नोंदणी करून लाखो रुपयांचा अपहार करून फिर्यादी व फिर्यादीच्या बहिणीची तसेच शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी फिर्यादीने सायण्णा रामराव शागालोलू, वनिता रामराव शागालोलु, रामप्रसाद रामराव शागालोलु, तेजप्रसाद रामराव शागालोलू व कल्पना प्रकाश मोतीवाले यांच्या विरुद्ध सदर बजार पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे.
सदर गुन्ह्यामध्ये आरोपी कल्पना प्रकाश मोतीवाले हिस अटक होईल या भीतीपोटी तिने मे. जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता तो न्यायालयाने फेटाळलेला होता. त्यामुळे आरोपीने मे. मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केलेला होता तो देखील उच्च न्यायालयाने फेटाळून लावला.
यात मूळफिर्यादीतर्फे ॲड. विरेश पुरवत, ॲड.संतोष न्हावकर, यांनी तर आरोपीतर्फे ॲड. राहुल विजयमाने यांनी काम पाहिले