शिक्षक अभियोग्यता परीक्षा शिक्षकासाठी का बँकेतील क्लार्क साठी..??

0

२२ फेब्रुवारीपासून असलेले शिक्षक भरतीसाठी घेतली जाणारी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही शिक्षकासाठी आहे की बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी….! असा प्रश्न हजारो विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा २२ फेब्रुवारी ते ३ मार्च पर्यंत होत आहे. डिसेंबर २०१७ मध्ये राज्यात पहिल्यांदा शिक्षक अभियोग्यता परीक्षा घेण्यात आली होती मात्र तात्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केलेले पदभरती अजून झालेली नाही.अजून ९३७ संस्थेचे जागा रिक्त असताना सुद्धा अशातच पहिल्या परीक्षेत ज्यांना संधी मिळाली नाही अशा उमेदवारांना २०२३ च्या शिक्षक अभियोग्यता चाचणी संधी मिळणार या अपेक्षने राज्यातील लाखो विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी केली. मात्र प्रत्यक्षात उमेदवारांना पेपर पॅटर्न, परीक्षेचे वेळापत्रक, अभ्यासक्रम, आणि परीक्षेचे विचारण्यात आलेले प्रश्न नियमावली आणि आयबीपीएस कंपनी अशा अनेक गोष्टीवर प्रश्न उपस्थित करत आहेत. राज्यभर परीक्षा केंद्रावर हजारो विद्यार्थी टेट ची परीक्षा देण्यासाठी आले असता आयबीपीएस आणि शिक्षण विभागाच्या नावाने नाराजी चेहऱ्यावर दिसून येत आहे. आणि परीक्षा संदर्भात आपली भावना व्यक्त करत आहेत. आतापर्यंत नेहमी बँकेचे परीक्षा घेणाऱ्या आयबीपीएस कंपनीला परीक्षेची जबाबदारी दिल्यामुळे हा गोंधळ झाला आहे. या परीक्षेत (मराठी -हिंदी -भूगोल -सामान्य ज्ञान) तसेच अध्यापनशास्र -मानसशास्त्र या अशा महत्त्वपूर्ण विषयांना कमी महत्त्व देऊन केवळ बुद्धिमत्ता आणि गणितावर भर देण्यात आला आहे. २०० मार्क च पेपर वाचत असताना भरपूर वेळ जात आहे अनेक विद्यार्थ्यांचे किमान ६०ते ७० प्रश्न सोडवण्याच वेळ मिळत नाही. पेपर तयार करताना डी.एड आणि बी.एड च्या उमेदवारांचा विचार केला गेला नाही. किंवा अभ्यासक्रमाचा विचार केला गेला नाही.

 

 

👇🏻 माझं मत
२०१७ नंतर व मुळातच २०१७ ची भरती आपण असताना मागासवर्गी यांच्या ५०% जागा न भरता या वेळी २०२३ ची दुसरी अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी (शिक्षकभरती) घेतली जात आहे. मुळातच आम्ही संघटनेच्या वतीने परीक्षेचा कालावधी, अभ्यासक्रम, पेपर फी, याविषयी शिक्षण विभागशी चर्चा केली असता त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आम्हाला मिळाला नाही. आणि आमची वारंवार वेळ वाढवून देण्यासंदर्भात, अभ्यासक्रमाची कठीणपातळी कमी करण्यासंदर्भात मागणी असताना सुद्धा परीक्षा त्यांनी लवकरात लवकर घाई-गडबडी मध्ये घेण्याचा निर्णय घेतला त्याचा फटका आज लाखो विद्यार्थ्यांना बसत आहे. मुळात २०० मार्काचा पेपर मध्ये विषयनुसार वर्गीकरण नाही. अभ्यासक्रम वेगळा व प्रश्न व त्यांची काठीण पातळी वेगळी आणि शिक्षक भरतीसाठी मानसशास्त्र व अध्यापन शास्त्राचा थोडाफारही प्रश्न नसताना. ही परीक्षा घाई गडबडत घेण्याचा एवढा अट्टाहास का केला गेला. त्याच्या पाठीमागे काही गोडबंगाल तर नाही ना असा संशय मनात निर्माण होत आहे. (आयबीपीस) या कंपनीच्या मुख्यालयाला संपर्क साधला असता त्यांचा प्रतिसाद आपल्याला सकारात्मक मिळत नाही.

ही परीक्षा शिक्षक साठी होत आहे का बँकेतील क्लार्क शिपाई साठी हेच लाखो विद्यार्थ्यांना समजत नाही.??आमची एकच मागणी आहे की परीक्षा रद्द करून थोडाफार अभ्यासासाठी वेळ देऊन परीक्षा अभ्यासक्रमानुसार लवकरात लवकर घेऊन लाखो उमेदवारांना न्याय दिला गेला पाहिजे लाखो विद्यार्थ्यांचा शासनाने विचार करून त्यांना रोजगार मिळून देण्यास सहकार्य करावे ही आमची विनंती .

प्रशांत शिरगूर
सह सचिव
डी.एड बी.एड स्टूडेंट असोसिएशन महाराष्ट्र राज्य.!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here