लांबोटीचे तानाजी खताळ यांचे निधन

0

केवळ सोलापूरच नव्हे तर संपूर्ण राज्यात नावलौकिक मिळवलेल्या हॉटेल जयशंकरचे सर्वेसर्वा मोहोळ तालुक्यातील लांबोटीचे सुपुत्र आणि प्रथितयश उद्योजक जि. प .सदस्य तानाजी खताळ यांचे हृदयविकाराने निधन झाले आहे.

अल्प परिचय…

तानाजी खताळ हे सोलापूर जिल्हा परिषदेचे कामती गटाचे सदस्य  होते.आज बुधवारी सकाळी त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने  निधन झाले .खताळ हे सोलापूर पुणे महामार्गावरील लांबोटी जवळील जयशंकर हॉटेल चे मालक होते, त्याच ठिकाणी त्यांचे निवासस्थान असल्याने ते सकाळी उठून झोपाळ्यावर बसले. तेव्हाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. मृत्युसमयी त्यांचे वय 55 होते .त्यांच्या पश्चात आई, भाऊ ,पत्नी ,मुले, नातवंडे असा परिवार आहे.

लांबोटी गावचे ते दहा वर्षे सरपंच होते. राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष मनोहर भाऊ डोंगरे, जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांचे ते कट्टर समर्थक होते .भीमा लोकशक्ती परिवार गटातून ते जिल्हा परिषद कामती गटातून विजयी झाले होते. जय शंकर हॉटेल लांबोटी चिवडा आणि चहासाठी त्या मार्गावरील प्रसिद्ध असे हॉटेल आहे तानाजी खताळ यांच्या मातोश्री रुक्मिणीबाई यांनी मोठ्या कष्टातून ते हॉटेल उभे केले आहे. रुक्मिणीबाई खताळ यांचा मोठा मुलगा तानाजी हा गेल्याने खताळ कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

लांबोटी येथील राहत्या घरी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
हसतमुख आणि हरहुन्नरी स्वभावाचे व्यक्तिमत्व लाभलेले तानाजी खताळ यांचा केवळ मोहोळ तालुक्यातच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात मोठा जनसंपर्क होता.

लांबोटी चहा आणि चिवडा हा राज्यभर प्रसिद्ध आहे.खताळ कुटुंबातील सदस्य यांनी परिश्रमाने हा ब्रँड निर्माण केला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here