४४वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन समारोप उत्साहात संपन्न

विज्ञान प्रदर्शनामूळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो; आ. सिद्धाराम म्हेत्रे

0

By-एम एच१३न्यूज वेब/टीम

सध्याच्या विज्ञान युगात विज्ञान प्रदर्शनसारखा प्रदर्शन अयोजनामुळे विध्यार्थ्यमध्ये आत्मविश्वास निर्माण होत असून शिक्षकांनी उत्तम वैज्ञानिक तयार करण्याचे कार्य करावे असे प्रतिपादन माजी गृहराज्यमंत्री तथा आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले.
पंचायत समिती शिक्षण विभाग आणि श्री गुरुषांतलिंगेश्वर कनिष्ठ महाविद्यालय दुधनीचे दशक पूर्ती वर्षानिमित्त मातोश्री लक्ष्मीबाई म्हेत्रे प्रशाला येथे आयोजित 44 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन समारोप सभेत बक्षीस वितरण करून बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी विरक्तमठ दुधनीचे पूज्य श्री.शांतलिंगेश्वर महास्वामीजीं होते.
व्यासपीठावर अक्कललोट तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष शंकर म्हेत्रे,गटविकास अधिकारी महादेव बेळळे,गटशिक्षणाधिकारी राजशेखर नागणसुरे,जिल्हा विज्ञान परिवेक्षक तथा शिक्षणविस्तार अधिकारी अशोक भांजे,रतीलाल भुसे,सुहास गुरव,केंद्रप्रमुख सिद्राम वाघमोडे समवेत मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांचे हस्ते प्रतिमापूजन करून कार्यक्रमाला चालना देण्यात आले.उपस्थित मान्यवरांच्या स्वागत गटशिक्षणाधिकारी राजशेखर नागणसुरे यांनी केले तर प्रस्तावना प्राचार्य बसवराज हिरतोट यांनी केले.

सिद्धाराम म्हेत्रे पुढे म्हणाले की, आजचा घडीला ग्रामीण भागातील विध्यार्थी सर्व क्षेत्रात स्वतःचे अस्तित्व निर्माण करत आहे.त्या विध्यार्थ्यांना योग्य व्यासपीठ निर्माण करून देण्याचे गरज आहे.शिक्षक,पालक या कडे योग्य मार्गदर्शन केल्यास भारत जगात महासत्ता होण्यासाठी वेळ लागणार नाही.
अध्यक्षस्थानी असलेल्या पूज्य शांतलीगेश्वर स्वामी बोलून ग्रामीण भागातील मोठ्या संख्येने विध्यार्थी या प्रदर्शनात सहभागी झाल्याने या वर्षीचे विज्ञान प्रदर्शन यशस्वी झाल्याचे दिसून आले.भारतीय संस्कृतीत शिक्षणाला फार महत्व असून त्यात विज्ञानाला खूप मोठे स्थान आहे. भारतीय सहभागी झालेल्या सर्व विध्यार्थी आणि शिक्षक विज्ञानी प्रेमींना उत्तम जेवण्याचे व्यवस्था केल्याबद्दल धन्यवाद सांगितले.
या वेळी मान्यवरांच्या हस्ते गुरुषांतलिंगेश्वर भावचित्र असलेलं वह्यांचे अनावरण करण्यात आले.
विज्ञान प्रदर्शनात यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि रोख बक्षीसे देऊन गौरविण्यात आले.
कर्तवक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य बसवराज हिरातोट, राम गद्दी, अरविंद करडे,सिद्धाराम येगदी, समवेत ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन कल्याणी करडे यांनी केले तर आभार प्रदर्शन केंद्रप्रमुख सिद्राम वाघमोडे यांनी मानले.
प्राथमिक विभाग:-
1 ओंकार चोरगी ,नूतन विद्यालय पानमंगरुळ
2निसर्गा पाटील, मंगरुळे प्रशाला अक्कलकोट
3 दर्शन तेलेकोणे ,मंगरुळे प्रशाला अक्कलकोट
उत्तेजनार्थ-शुभम मोसलगी ,मातोश्री म्हेत्रे प्रशाला दुधनी
माध्यमिक विभाग
1शिवराज विजापुरे, एस व्ही भावी विद्यालय गुड्डेवाडी
2 वसीम शेख, बोरोटीआश्रम शाळा
3परवेझ जमादार ,खेडगी प्रशाला अक्कलकोट
उत्तेजनार्थ – बसवराज थंब ,मंगरुळे प्रशाला अक्कलकोट.
प्राथमिक शिक्षक
1गिरीश हवालदार, रेवुगोळ वस्ती नाविदगी
2 पिंजारी ए एस,
मातनळळी जी.प.शाळा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here