लाच घेताना तलाठीला केले ‘ए.सी.बी.’ ने जेरबंद

0

Mh13News Network

शेतातील रस्ता वहिवाटी साठी खुला करून देण्यासाठी अर्जावर सुनावणी होऊन निकाल तुमच्या बाजूने लावून देतो म्हणून वीस हजाराची लाच मागितली त्यामुळे तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी अटक केले.

समाधान बाळासाहेब काळे, वय ३३, वर्ष व्यवसाय नोकरी, पद तलाठी सज्जा खानापूर, तहसिल अक्कलकोट, रा समर्थ नगर, अक्कलकोट जि. सोलापूर असे अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे.

तक्रारदार यांनी त्यांच्या मौजे अंकलगे येथील शेतजमिनी मधुन जाणे येण्याकरीता तसेच शेतमालाची ने आण करण्याकरीता वहीवाटी रस्ता खुला करुन मिळणेबाबत तहसिलदार कोर्ट, अक्कलकोट येथे सादर केलेल्या अर्जावर सुनावणी होवुन तक्रारदार यांच्याबाजुने निकाल लावुन सदर निकालाची प्रत देण्याकरीता यातील आलोरो समाधान काळे तलाठी सज्जा खानापुर, तहसिल अक्कलकोट यांनी २५,००० रुपयांची मागणी करून त्यापैकी पहिला हप्ता २० हजार रुपयांची मागणी केली, हे सिद्ध झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तलाठी काळे बुधवारी ताब्यात घेतले त्याच्या विरोधात अक्कलकोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई संजीव पाटील, पोलीस उप अधिक्षक अॅन्टीकरप्शन ब्युरो सोलापुर उमाकांत महाडिक पोलीस निरीक्षक, पोहवा/सोनवणे, पोना/ श्रीराम घुगे, पोकों/उमेश पवार व पोकों/ स्वप्नील सणके सर्व नेम अॅन्टी करप्शन ब्युरो सोलापूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here