प्रभाग २५, २६ येथे सुभाष देशमुखांच्या प्रचारार्थ पदयात्रा

0

By-MH13News,network

दक्षिण सोलापूर मतदारसंघ भाजप, शिवसेना, रासप, रिपाई, शिवसंग्राम, रयतक्रांती महायुतीचे अधिकृत उमेदवार सुभाष (बापू) देशमुख यांच्या प्रचारार्थ शनिवारी सायंकाळी दक्षिण सोलापूर मतदार संघातील प्रभाग २५ व २६ येथे भाजप युवा नेते मनीष देशमुख यांच्या यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा संपन्न झाली.

शांती नगर, बापूजी नगर येथून पदयात्रेला सुरुवात करण्यात आली, यावेळी सोलापूर महानगरपालिका सभागृह नेते श्रीनिवास करली, नगरसेविका मनीषा हुच्चे, नगरसेवक सुभाष शेजवाल, शिवसेना महिला आघाडीच्या उज्वला येतुरे, प्रमोद हुच्चे, डॉ शिवराज सरतापे, डॉ रफिक सय्यद, आदित्य हुच्चे, सद्दाम मोमीन, अक्षय अंजीखाने, सलीम सय्यद, सागर अतनुरे, परिसरातील नागरिक, महिला कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पदयात्रेचे ठिकठिकाणी नागरिकांनी स्वागत केले. सुभाष देशमुख यांना बहुमताने निवडून देण्यासाठी नागरिकांनी २१ ऑक्टोबरला मतदान करून मतपेटीतून बापूंना असलेला पाठिंबा दर्शविण्याचे आवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here