सोलापूरच्या विद्यार्थ्यांना मिळावे जागतिक दर्जाचे शिक्षण

0
गिरिकर्णिका फाऊंडेशनचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना निवेदन
पु.अ.हो.सोलापूर विद्यापीठातुन विविध विद्या शाखेतुन शिक्षण घेणारे सुमारे ७०,००० विद्यार्थी असून त्यांना कालानुरूप अभ्यासक्रम आणि जागतिक पातळीवरचे दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी गिरिकर्णिका फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय कुंदन जाधव यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना निवेदन दिले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @ सोलापूर ह्या मोहिमे अंतर्गत महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे पु.अ.हो.सोलापूर विद्यापीठाशी  निगडित सर्व घटकांच्या तक्रारी आणि सुचनांचे तात्काळ निसरण करण्यासाठी उपस्थित होते.
सोलापूरच्या युवकांना जागतिक स्तरावरील अद्ययावत अभ्यासक्रम उपलब्ध करून दिल्यास त्यांना पदवी प्राप्त केल्यानंतर इतर विद्यापीठाच्या तुलनेत अधिक मान मिळेल ह्या करिता गिरिकर्णिका फाऊंडेशनने अनेक नाविन्यपूर्ण सुचना पु.अ.हो.सोलापूर विद्यापीठ प्रशासनाला वेळोवेळी दिल्या आहेत. गिरिकर्णिका फाऊंडेशनच्या वतीने देश आणि सोलापूरच्या विकासाठी उत्कृष्टपणे राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय कुंदन जाधव यांनी उदय सामंत यांना दिली.
जगभरातील नामांकित विद्यापीठे, आंतरराष्ट्रीय तथा बहुराष्ट्रीय कंपन्या, नोबेल पारितोषिक विजेते तज्ञ मंडळी यांच्या समवेत सामंजस्य करार केल्यास सोलापूराच्या विद्यार्थ्यांचे ज्ञानाच्या कक्षा वृद्धिंगत होऊन ते भविष्यात सोलापूर आणि देशाचे नाव उज्ज्वल करतील असा आशावाद विजय कुंदन जाधव यांनी उदय सामंत यांना आपल्या निवेदनातुन अधोरेखित करुन दिले. गिरिकर्णिका फाऊंडेशनच्या वतीने देण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण निवेदनाची त्वरित दखल घेऊन मंत्री उदय सामंत यांनी सदर निवेदनात नमूद केलेल्या सुचनांचे तात्काळ अनुपालन करण्याच्या सुचना अधिकार्‍यांना दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here