जेएनयू विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ, सरकारच्या दडपशाहीविरूद्ध तीव्र निदर्शने

0

By-MH13News, network

डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय) व स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय)च्या वतीने शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता सोलापूर जिल्हा मा.जिल्हाधिकारी यांचे कार्यालय पूनम गेटवर दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ येथील शुल्क वाढ विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अमानुष लाठी हल्ला करण्यात आला याच्या निषेधार्थ व त्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थनार्थ तीव्र निदर्शन करण्यात आले.

जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेला संघर्ष हा केवळ त्यांच्यापुरता किंवा दिल्लीपुरता

मर्यादित राहिला नाही. देशातील सार्वजनिक शिक्षण वाचविण्याची मागणी करणारे जेएनयू विद्यार्थ्यांचे आंदोलन आता भारतातील तमाम युवक आणि विद्यार्थी वर्गाचे आंदोलन बनले आहे.

१८ नोव्हेंबर रोजी जेएनयू विद्यार्थ्यांनी काढलेल्या मोर्चावर पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केला. मागील आठवड्यात अखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण परिषदेच्या कार्यालयासमोर जबरदस्त आंदोलन होऊनही प्रशासनाने मागण्या सोडवल्या नाहीत. म्हणून पुन्हा १८ नोव्हेंबर रोजी जेएनयूमधील शुल्क वाढ रद्द करा व सार्वजनिक शिक्षण वाचविण्याच्या मागणीसाठी दिल्ली येथे संसद भवनावर विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला.

लोकशाही मार्गाने चाललेल्या आंदोलनाला पोलिसांनी अडवून अत्यंत अमानुषपणे लाठीचार्ज केला. एक-एक विद्यार्थी पोलिसांनी बाजूला घेतला आणि क्रुरपणे त्यांना मारहाण केली. हे अत्यंत निंदनीय आहे. पोलिसांचा आणि सीआरपीएफ जवानांचा वापर करून मोर्चावर लाठीहल्ला केला. यामध्ये अनेकांना गंभीर जखमा झाल्या. तसेच अनेकांना अटक करण्यात आले. या पोलिसी लाठीहल्ल्याचा होईल तितका निषेध कमीच असेल. या मोर्चाला चिरडून टाकण्याचे सर्व प्रकारचे प्रयत्न करून झाले. लाठीहल्ला होऊन सुद्धा जेएनयू विद्यार्थ्यांच्या मोर्चाने माघार घेतली नाही. तिथेच ठिय्या मांडून आंदोलन सुरू ठेवले. लोकशाही मार्गाने सुरु असलेल्या आंदोलनाला चिरडून टाकण्यासाठी सरकारने पोलिसी बळाचा वापर करून आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला करणे. हे अत्यंत निषेधार्ह आहे. जेएनयू विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या दडपशाहीचा डीवायएफआय व एसएफआय जाहीर निषेध करते.अशा तीव्र शब्दांत अनिल वासम यांनी प्रतिक्रिया व्यक्त केले.
विद्यार्थी आघाडी मल्लेशाम कारमपुरी हे बोलताना म्हणाले की,जर ही दडपशाही अशीच चालू राहिल्यास आगामी काळात याहून अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.

निषेधाचे फलक दाखवून गगनभेदी आवाज जोरदार घोषणा दिले.

1.सार्वजनिक शिक्षण वाचवा देश वाचवा
2. विदयार्थी वाचवा देश वाचवा
3.JNUच्या विद्यार्थी आंदोलनावर हल्ला करणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असो !
5. शिक्षण आमचा अधिकार आहे !
6.JNU मधील शुल्कवाढ रद्द झालीच पाहिजे !
7.JNU मधील विदयार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे !
8.SAVE STUDENT SAVE NATION
9.SAVE PUBLIC EDUCATION SAVE NATION

10.पोलीस प्रशासनाच्या दंडेलशाही चा धिक्कार असो !
11. वाचवा हो वाचवा !
देशाचे भवितव्य वाचवा हो !
12.विद्यार्थ्यांना गुन्हेगाराची वागणूक देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो

यावेळी वेळी युवा जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी, अशोक बल्ला, दत्ता चव्हाण ,बालकृष्ण मल्याळ,विजय हरसुरे,मधुकर चिल्लळ, अकिल शेख,आसिफ पठाण, सनी कोंडा, नरेश गुल्लापल्ली, शिवानंद श्रीराम, एस.एफ.आय चे जिल्हा सचिव मल्लेशम कारमपुरी, जिल्हाध्यक्ष राहुल जाधव, उपाध्यक्ष श्यामसुंदर आडम, पूनम गायकवाड, विजय साबळे, राहुल भैसे, शहनवाज शेख, दुर्गादास कनकुंटला, प्रशांत आडम, किशोर झेंडेकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here