…यासाठी लवकरात लवकर सोलापूरची विमानसेवा सुरु करावी – खा. जयसिद्धेश्वर महास्वामीजी 

लोकसभा अधिवेशनात विमानसेवेसंबंधी प्रश्न उपस्थित

0

MH13 NEWS NETWORK:

केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत सोलापूरची विमानसेवा प्रलंबित आहे. त्यामुळे पर्यटक, भाविक, उद्योगपती , व्यापाऱ्यांना असुविधा होत आहे. त्यासाठी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री यांनी सोलापूरच्या विकासासाठी लवकरात लवकर विमानसेवा सुरु करण्याची मागणी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांनी केली.

गुरुवारी अधिवेशनाच्या शून्य काल दरम्यान खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी सोलापूरच्या विमानसेवेसंदर्भात प्रश्न उपस्थित केला. यावेळी, सोलापूरची चादर, टर्कीस टॉवेल, जगप्रसिद्ध असून जगभरात निर्यात केली जाते. तसेच सोलापूर जिल्ह्यास स्वतंत्र विद्यापीठ व राष्ट्रीय औष्णिक प्रकल्प (एन.टी.पी.सी) आहे. त्यामुळे सोलापूर एक मोठी बाजारपेठ म्हणून नावारूपास येत आहे. त्याचप्रमाणे सोलापूर एक स्मार्ट सिटी म्हणून विकसित होत आहे. सोलापूर जिल्हा सुप्रसिद्ध तिर्थक्षेत्र , पर्यटन केंद्र असलेला जिल्हा आहे. सोलापूरच्या आसपास पंढरपूर, मंगळवेढा, गाणगापूर, हैद्रा, कुडलसंगम, अक्कलकोट, या तीर्थक्षेत्रांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह सर्व देशभरातून लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. परंतु सोलापूरला विमानसेवा उपलब्ध नाही.

केवळ भाविकच नव्हे तर उद्योगपतींसह अन्य क्षेत्रातील मान्यवरांना विमानसेवा नसल्याने असुविधा होत आहे. त्यासाठी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री यांनी विनंती कर सोलापूरला लवकरात लवकर विमानसेवा सुरु करण्याची मागणी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजींनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here