हा ‘अवलिया’ ठरतोय महेश कोठेंचा स्टार प्रचारक.!

तब्बल २५ किलोमीटर सायकलवरून करतोय प्रचार व लोकप्रबोधन

0

विशेष प्रतिनिधी
आजच्या घडीला सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ असं बनलं आहे की, दर दोन तासाने कोण आघाडीवर कोण पिछाडीवर या चर्चेला ऊत येत आहे. पंचरंगी लढतीत मातब्बर असणारे उमेदवार वेगवेगळ्या निवडणूक जिंकण्याच्या तंत्राने शक्कल लढवत आहेत. विविध प्रकारची प्रचार यंत्रणा, कॉर्नर सभा, पथनाट्य, रिक्षा याद्वारे प्रचार केला जातोय.

सध्या मात्र शहर मध्य विधानसभा मतदारसंघात सायकलवरून प्रचार करणारा हा अवलिया अपक्ष उमेदवार महेश कोठे यांचा स्टार प्रचारक ठरत आहे. दररोज तब्बल 25 किलोमीटर सायकलवरून प्रचार करून लोक प्रबोधन ही करत आहे. श्रीनिवास यन्नम उर्फ कामटे असं या युवकाचे नाव आहे.मतदार संघात लोकांच्या चर्चेचा हा मोठा विषय होत आहे आहे.
आजच्या सोशल मीडियाच्या प्रचाराच्या युगात सायकलवरुन घरोघरी मतदारांच्या भेटी घेऊन केला जाणारा प्रचार लक्षवेधी ठरत आहे.

शहर मध्यचे अपक्ष उमेदवार महेश कोठे यांनी नगरसेवक असूनही केलेली विकासकामे प्रत्यक्ष पाहून प्रचार करण्याचे ध्येय हाती घेतले. पुढील ३ दिवस रोज २५ km सायकलवर प्रचार व लोकप्रबोधन करणार आहे. सायकलच्या समोर गॅस शेगडी ठेवून मागे लहान ध्वनीवर्धक ( स्पीकर ) लावून कोठे यांच्या कार्याचे महत्व जनतेस सांगत आहे व लोकांमध्ये बदल घडवण्याचे कार्य करत आहे.तसेच मतदानासाठी लोक प्रबोधन करत आहे आहे.
श्रीनिवास दत्तात्रय यन्नम ( कामटे )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here