हिप हिप हुर्रे | दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
  • दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेला आजपासुन सुरुवात

बुधवारी सांस्कृतिक कार्यक्रम तर गुरुवारी कर्मचाऱ्यांच्या बाॅक्स क्रिकेट स्पर्धा

सोलापूर (प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण कल्याण विभागाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेला आजपासून (दि.3) सुरुवात होणार असल्याची माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांनी दिली.
दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत सोलापूर शहर व जिल्ह्यातील अंध, मुकबधीर, मतिमंद, अस्थिव्यंग या प्रवर्गाच्या शाळांमधील एक हजार विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी होणार असल्याचे सांगून खमितकर म्हणाले,”दरवर्षी जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून राज्याच्या दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या वतीने जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय व राज्य शासनाच्या सामाजिक न्याय ‌विभागाच्या दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या वतीने राज्यस्तरीय दिव्यांग ‌विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते.कोरोनामुळे दोन वर्षे या स्पर्धा झाल्या नाहीत. त्यामुळे यंदा दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह आहे.
दिव्यांग विभागाचे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता सच्चिदानंद बांगर म्हणाले, सोलापुरातील नेहरू नगर येथील शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या मैदानावर ही क्रीडा स्पर्धा होणार असल्याचे सांगून मंगळवारी (दि.3 ) सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. पोलिस आयुक्त राजेंद्र माने, जिल्हा पोलीस प्रमुख शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एन.कोहीनकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विजयसिंह पवार,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) जावेद शेख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) ईशादीन शेळकंदे यावेळी उपस्थित राहणार आहेत.दि.3 रोजी दिवसभर क्रीडा स्पर्धा चालणार आहेत.


बुधवार दि.4 रोजी सकाळी ‌दहा वाजता छत्रपती रंगभवन सांस्कृतिक सभागृहात दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेला सुरुवात होणार आहे. प्रभारी मुख्य कार्यकारी ‌अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी ‌अधिकारी एस.एन.कोहीनकर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.


बुधवारी दुपारी चार वाजता पारितोषिक वितरण समारंभ होणार असून सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शितल उगले-तेली यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देण्यात येतील.जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.मुख्य लेखा व वित्त अधिकारी विजयसिंह पवार,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) जावेद शेख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) ईशादीन शेळकंदे यावेळी उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेच्या यशस्वी नियोजनासाठी विविध समित्या गठित करण्यात आल्या ‌असून मुख्य नियोजन समितीचे प्रमुख जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील ‌खमितकर हे आहेत.

वै.सा.का. सच्चिदानंद बांगर, शशिकांत ढेकळे, अरुण धोत्रे, राजकुमार पाटील समिती सदस्य आहेत.क्रीडा समितीमध्ये प्रशांत पवार, कालिदास लोखंडे, मच्छिंद्र अंगुले, कविता कोळगे हे ‌आहेत. 450 दिव्यांग विद्यार्थी सोलापूरमध्ये निवासी थांबणार असून पोपट घोडके, शिवानंद कुरमुते, सुरेश ईटकर हे निवास समितीमध्ये आहेत.

भोजन समितीचे प्रमुख राजकुमार पाटील ‌हे आहेत. तक्रार निवारण समितीचे प्रमुख सच्चिदानंद बांगर हे आहेत. या ‌स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा समाज ‌कल्याण अधिकारी सुनील खमितकर, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता सच्चिदानंद बांगर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here