‘कोणीही’ घराबाहेर पडू नये : डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य

0

MH13NEWS Network

काशीपीठातर्फे 7 लाखांचा मदतनिधी जाहीर

सोलापूर : प्रशासित राहण्यापेक्षा अनुशासित राहणे ही काळाची गरज आहे. स्वतःच्या व इतरांच्या प्राणरक्षणासाठी कोणीही घराच्या बाहेर पडू नये.असे आवाहन श्री श्री श्री १००८ जगद्गुरू डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी, जंगमवाडी मठ, काशी पीठ यांनी केले आहे.

महास्वामी बोलताना पुढे म्हणाले की आज कोरोनारूपी महामारीने संपूर्ण जगाला व्यापून टाकले आहे. हा आजार सर्व मानवांना मृत्यूच्या दरीत ढकलून देत आहे. याचे कारण मानवाचा आहार-विहार विषम झाला हेच होय. या आजारावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणून आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी तसेच भारताच्या सर्व राज्यांतील मुख्यमंत्र्यांनी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी लोकांनी घराबाहेर येऊ नये, असे आवाहन केले आहे. घराबाहेर न पडणे हे एका दिवसापुरते नसून कोरोना रोगाचे संपूर्ण उच्चाटन होईपर्यंत सर्वांनी याचे पालन अवश्य केले पाहिजे.

याचवेळी काशी पीठातर्फे वतीने कोरोनाच्या संकट काळात केंद्र शासनाला 2 लाख ₹ आणि कर्नाटक सरकारला 5 लाख ₹ मदतनिधी देण्यात येणार असल्याचेही जगद्गुरू डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी जाहीर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here