MH13 News Network
विभागीय सॉफ्टबॉल स्पर्धेत सोलापूरचे वर्चस्व
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्रा राज्य पुणे ,जिल्हा क्रीडा कार्यालय सोलापूर, जिल्हा क्रीडा परिषद, सोलापूर व संगमेश्वर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे विभागीय सॉफ्टबॉल स्पर्धा दिनांक 10 ते 11 जानेवारी दरम्यान संगमेश्वर कॉलेजच्या मैदानावर संपन्न झाल्या या स्पर्धेचे उद्घाटन संगमेश्वर कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. राजेंद्र देसाई , क्रीडाधिकारी सुनील धारूरकर, उपप्राचार्य प्रसाद कुंटे शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा.संतोष खेंडे यांच्या उपस्थितीत झाले.
या स्पर्धेत सोलापूर शहर व जिल्ह्याने वर्चस्व मिळवले या विभागीय स्पर्धेत 14 ,17, 19, वर्षे मुला मुलींच्या गटातून एकूण 42 संघ सहभागी झाले.
या स्पर्धेसाठी पंच म्हणून पंचप्रमुख सिताराम भांड ,सागर जगझाप ,महादेव वाघमारे ,उमेश वाघमारे ,निलेश वाघमारे ,रणविजय काटंबे, समर्थ आहेरवाडी ,अनिकेत वाघमारे, विराज वरशेट्टी, अनिकेत कांबळे, ओंकार पाटील, सुरज वाडे, शुभम वाघमारे यांनी काम पाहिले.
अंतिम निकाल
14 वर्षे मुले
प्रथम – सोलापूर ग्रामीण
द्वितीय -सोलापूर शहर
तृतीय -पीसीएमसी
17 वर्षे मुले
प्रथम -सोलापूर ग्रामीण
द्वितीय – सोलापूर शहर
तृतीय –पीसीएमसी
१९ वर्षे मुले
प्रथम -सोलापूर शहर
द्वितीय -सोलापूर ग्रामीण तृतीय
14 वर्षे मुली
प्रथम -पुणे ग्रामीण
द्वितीय -अहमदनगर ग्रामीण तृतीय -सोलापूर शहर