माढा :वादळी वाऱ्यात चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

0

माढा तालुक्यात मंगळवारी वीजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी वीजही पडल्याचा घटना घडल्या. वादळी वाऱ्याने भोगेवाडी येथील पिसाळ वस्ती येथे कुर्मदास पिसाळ यांच्या घरावरील पत्रे उडाले. त्यावेळी घरात समर्थ तसेच त्याची आई आणि मोठ्या तीन बहिणी होत्या. घरावरील उडालेला पत्रा व वीट डोक्यात लागल्याने लहानग्या  समर्थसह त्याची आई पल्लवी व बहिणी जखमी झाल्या.

भोगेवाडी ते पिसाळ वस्ती येथे जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नाही. जोरदार वारा व पाऊस यामुळे जखमी अवस्थेत असलेल्या समर्थला कुर्डूवाडी येथे दवाखान्यात आणण्यास उशीर झाला होता. समर्थ कुर्मदास पिसाळ (वय ४) या चिमुकल्याचा दूर्दैवी अंत झाला. या घटनेने परिसरावर शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here