सोलापूर | ग्रामीण भागातील ‘कोरोनामुक्त’ 2248 आज 131 पॉझिटिव्ह ; या भागातील

0

MH13 News Network

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. आज रविवारी ग्रामीण भागातील 131 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 80 पुरुष तर 51 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 94 आहे. आज 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 3943 इतकी झाली आहे. यामध्ये 2403 पुरुष तर 1540 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे तर आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 112 जणांचा मृत्यू झाला आहे यात 75 पुरुष तर 37 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 1583 आहे .यामध्ये 985 पुरुष 598 महिलांचा समावेश होतो आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 2248 यामध्ये 1343 पुरुष तर 905 महिलांचा समावेश होतो.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here