कोरोनामुळे उपचारासाठी गेलेल्यांच्या ‘घरफोड्या’ करणाऱ्या’त्या’ सराईत चोरट्यांना …

0

MH13News Network
सोलापूर शहरामध्ये मागील काही दिवसामध्ये कोरोना संसर्गाने मोठया प्रमाणात धुमाकूळ घातला होता. त्यामध्ये काहीजणांचे पूर्ण कुटुंब उपचारासाठी हॉस्पिटल दाखल होते. याची संधी साधत चोरट्याने घरफोडी केल्याचे गुन्हे विविध पोलीस ठाण्यात गुन्हेदाखल होते. सोलापूर गुन्हे शाखेनी सराफ बाजारात सोने विक्रीसाठी येणाऱ्या सराईत गुन्हेगारास जेरबंद करुन 4 लाख 60 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Crime

 

गुप्त बातमीदाराकडून गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बंडगर यांना सराईत गुन्हेगार आकाश महादेव उडाणशिव (रा. देवनगर, सोरेगाव) हा सराफ बाजारात सोने विक्री साठी येणार असल्याची माहिती मिळताच बागवान मस्जिद येथे सापळा लावून पकडण्यात आले.त्याच्याकडून 4 लाख 20 हजार रुपयाचे 145 ग्रॅम सोने हस्तगत केले असून हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून याच्या विरोधात 11 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

याबरोबरच फौजदार चावडी व एम.आई.डी.सी. पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगार मेहबुब बादशाह इस्माईल शेख घरफोडीतील सोने विक्रीसाठी नई जिंदगी ,मौलाना आझाद चौक येथे येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांना बातमीदाराकडून मिळताच सापळा लावून या आरोपीला अटक केली

त्याच्याकडून 5 ग्रॅम सोने 15 हजार रुपयाचा सॅमसंग मोबाईल आणि रोख रक्कम 10 हजार असा 30 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला गुन्हे शाखेच्या पोलिसाच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त गुन्हे बापू बांगर, सहायक पोलीस आयुक्त अभय डोंगरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन बंडगर, पोलीस उप निरीक्षक संदीप शिंदे यांच्यासह पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here