आता येणार रंगत ! महापालिकेच्या मागासवर्ग प्रवर्ग व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण सोडत..

0

राज्य निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 करिता नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व सर्वसाधारण महिलासाठी आरक्षण निश्चित करण्याकरिता आज 11.00 वाजता, नियोजन भवन, सातरस्ता सोलापूर येथे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम घेण्यात आले.आरक्षणाची सोडत पारदर्शक ड्रम मधून दिव्यांग (अंध) विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठीद्वारे काढण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्त पि. शिवशंकर यांनी आरक्षण सोडतीचे वाचन केले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, सहायक आयुक्त विक्रम पाटील,सह नगर रचना संचालक लक्ष्मण चलवादी ,नगर सचिव प्रवीण दंतकाळे,झोन अधिकारी रामचंद्र पेंटर भैरूरत्न दमाणी अंधशाळेचे विद्यार्थी योगीराज दानवे, कार्तिक जानकर, दर्शना लांडगे,सुजाता माळी तर शिक्षक वंदना कोकीळ, महादेव चव्हाण त्याचबरोबर राजीव गांधी मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड चे विद्यार्थी अन्नपूर्णा साखरे, काळुबाई जाधव, मनपा प्राथमिक शिक्षणाची विभागाचे शिक्षक अविनाश शिंदे, गुरुप्रसाद तलवार, सचिन जाठवार, प्रभात चव्हाण,दत्तात्रय सोनवणे, नागेश जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Arakshan chart

.सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षणाची प्रसिध्दी स्थानिक वर्तमानपत्र, मनपाचे वेबसाईट व विभागीय अधिकारी कार्यालय क्र. 1 ते 8 येथे ठेवणेत येणार आहे.प्रभाग निहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी दि. 30/07/2022 ते 01/08/2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत व दि. 02/08/2022 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत हरकती व सूचना निवडणूक कार्यालय, कोटणीस हॉल, आयसीआयसीआय बँकेच्यावर, सोलापूर महानगरपालिका येथे व विभागीय कार्यालय क्र. 1 ते 8 येथे स्वीकारण्यात येतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here