दौड | सोलापूर मॅरेथॉनमधून कचरा विलगीकरणासाठी जनजागृती होणार

0

सोलापूर मॅरेथॉनमधून कचरा विलगीकरणासाठी जनजागृती होणार
8 जानेवारी रोजी आपटे डेअरी सोलापूर मॅरेथॉनचे आयोजन
सोलापूर,(प्रतिनिधी):- सोलापूर रनर्स असोसिएशनच्या वतीने रविवार दि. 8 जानेवारी रोजी आपटे डेअरी प्रायोजित सोलापूर मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले असून यंदाच्या मॅरेथॉनमध्ये कचरा विलगीकरणसाठी जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष डॉ.स्वप्नील कोठाडीया आणि आपटे डेअरीचे अभिषेक आपटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.


गेल्या 6 वर्षापासून सोलापूर रनर्स असोसिएशनच्या वतीने सोलापूर मॅरेथॉन यशस्वीपणे आयोजित करीत आहे. कोरोनाच्या दोन वर्षाच्या काळातही नागरीकांना ऑनलाईन पध्दतीने व्हर्च्युअल मॅरेथॉनचे आयोजन करून शरीर सदृढ ठेवण्यासाठी विशेष मॅरेथॉन घेण्यात आली. कोरोना नंतरची ही मॅरेथॉन म्हणजे पुन्हा नव्याने सुरूवात आहे. मोठ्यासंख्येने यामध्ये सहभाग घेण्यासाठी नोंदणी केली जात आहे. 21 किलो मिटर, 10 किलो मिटर आणि साडे तीन किलो मिटरची फन रन अशा तीन गटात ही मॅरेथॉन होणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाची सोलापूर मॅरेथॉन यंदा सोलापूरमधील सुप्रसिध्द सराफ व्यापारी आपटे यांनी नव्याने सुरू केलेल्या आपटे डेअरी या नव्या उद्योगाच्या सहकार्याने होणार असल्याने आपटे डेअरी सोलापूर मॅरेथॉन या नावाने ही मॅरेथॉन होणार आहे.

 

दरवर्षी वेगवेगळी थिम घेवून सोलापूर मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येते त्यानुसार यंदाच्या मॅरेथॉनमध्ये नागरीक तसेच शहर वासियांनी ओला आणि सुका कचरा विलगीकरण कसे केले पाहिजे त्यापासून कसा फायदा आहे याबाबतची जनजागृती करण्यात येणार आहे. सोलापूर महानगर पालिकेने ठेवलेल्या या उद्देशात सोलापूर रनर्सचाही सहभाग राहणार आहे. यापुर्वी सोलापूर रनर्स असोसिएशनने स्वच्छतेवर आधारीत उपक्रम राबवला होता. त्यानंतरच्या मॅरेथॉनमध्ये हरित सोलापूर ही संकल्पना राबवून वृक्ष लागवडीचा उपक्रम राबवला. सोलापूर मॅरेथॉन ज्या मार्गावरून होते तो मार्ग आंतरराष्ट्रीय मानांकना प्रमाणे असून या मार्गावरील दोन्ही बाजुला सोलापूर रनर्स असोसिएशनच्या वतीने वृक्षारोपन करून त्याचे योग्य ते संगोपन करण्यात आले आहे.
मॅरेथॉनमध्ये सहभागी स्पर्धकांना टी शर्ट, टाईम बीब, गुडी बॅग, सहभागी मेडल असे साहित्य पुरवण्यात येणार आहे तसेच मॅरेथॉनच्या मार्गावर पाणी, एनर्जी ड्रिंक, नाष्टा, तज्ञ डॉक्टरांची टीम आणि रुग्णवाहिका तसेच महिलां मुलींसाठी बायो टॉयलेटची सुविधा करण्यात येणार आहे.  सोलापूर मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी www.solapurmarathon.com   या वेबसाईटवर नाव नोंदणी करणे आवश्यक असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. गेल्या 6 वर्षापासून सोलापूर मॅरेथॉन यशस्वी करण्यासाठी पोलीस आयुक्तालय, सोलापूर महानगर पालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, आरटीओ कार्यालय, आरोग्य विभाग वाहतुक विभाग, हरिभाई देवकरण प्रशाला, नूमवि प्रशाला यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

मॅरेथॉनचा मार्ग आणि वेळ –
21 किलो मिटरचा मार्ग – ज्ञानप्रबोधीनी प्रशालेपासून सकाळी 5.40 वा. सुरूवात, डफरीन चौक, जुना एम्प्लायमेंट चौक, सातरस्ता, पत्रकार भवन, विजापूर नाका, आयटीआय चौक, भारती विद्यापीठ, डी मार्ट, टाकळीकर मंगलकार्यालय, विजापूर रोड मार्गे एसआरपीएफ मैदानापासून माघारी येवून पुन्हा त्याच मार्गाने ज्ञानप्रबोधीनी प्रशालेसमोर समारोप होणार आहे.
10 किलो मिटरचा मार्ग – ज्ञानप्रबोधीनी प्रशालेपासून सकाळी 6 वा. सुरूवात, डफरीन चौक, जुना एम्प्लायमेंट चौक, सातरस्ता, पत्रकार भवन, विजापूर नाका, आयटीआय चौक, भारती विद्यापीठ, जुळे सोलापूर संतोष नगर येथून माघारी येवून पुन्हा त्याच मार्गाने ज्ञानप्रबोधीनी प्रशालेसमोर समारोप होणार आहे.
3.5 किलो मिटरची फन रन मार्ग – ज्ञानप्रबोधीनी प्रशालेपासून सकाळी 7.30 वा. सुरूवात, डफरीन चौक, जुना एम्प्लायमेंट चौक, सातरस्ता येथून पुन्हा त्याच मार्गाने ज्ञानप्रबोधीनी प्रशालेसमोर समारोप होणार आहे.

सोलापूर रनर्सची टीम –
अध्यक्ष डॉ. स्वप्नील कोठाडीया, कार्याध्यक्ष डॉ. विश्वास बिराजदार, खजिनदार डॉ. योगेश जडे, रेस डायरे्नटर डॉ. विक्रम दबडे, माजी अध्यक्ष डॉ. यशवंत पेठकर, डॉ. विनायक देशपांडे, डॉ. विवेक कुलकर्णी, डॉ. भास्कर पाटील, डॉ. नितीन बलदवा, डॉ. गोरख रोकडे, डॉ. गुरू जालीमिंचे, डॉ. किरण किणीकर, डॉ. महेश बिलुरे, डॉ. प्रदीप भोई, डॉ. सुभाष भांगे, अभय देशमुख, अजित वाडेकर, बसवराज    , संजय सुरवसे, जयंत होलेपाटील, श्रीनिवास संगा, स्वप्नील नाईक, रोषण भुतडा, ओंकार दाते, डॉ. विठ्ठल कृष्णा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here