सोलापूर | आज 2538 निगेटिव्ह तर 162 पॉझिटिव्ह ; तीन जणांचा मृत्यू …वाचा

0

MH 13 News Network

सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज रविवारी दुपारी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री12 पर्यंत एकूण 2700 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी 2538 अहवाल निगेटिव्ह आले असून 162 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात 82 पुरुष तर 80 महिलांचा समावेश होतो .आज 290 प्रलंबित तपासणी अहवाल असल्याची माहिती सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. 43 बाधित व्यक्ती बऱ्या होऊन घरी गेल्या आहेत.

3 व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. अशी माहिती सोलापूर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.


आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 4563 इतकी झाली आहे, तर आजपर्यंत एकूण 345 जणांचा मृत्यू झाला आहे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1377 इतकी आहे, तर रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 2841 इतकी समाधानकारक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here